Headlines

पाकिस्तानी खेळाडूचा ओळखण्यास नकार, तरी Urvashi Rautela म्हणाली,…Love You

[ad_1]

दुबई : पाकिस्तान क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज नसीम शाह (Naseem Shah) आणि बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) यांच नाव गेल्या काही दिवसांपासून जोडलं जातंय. या घटनेत नसीम शाहने एका मुलाखतीत उर्वशी रौतेलाला ओळखण्यासचं नकार दिला होता. कोण आहे उर्वशी? असा प्रतिसवाल त्याने केला होता. या घटनेनंतर उर्वशी रौतेला चांगलीच ट्रोल झाली होती. मात्र आता तिने पुन्हा एकदा आपल्या प्रेमाची कबूली देणारी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यामुळे ओळखण्यास नकार देणाऱ्या नसीम शाहला ती लव्ह यु का म्हणतेय, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडलाय. 

पाकिस्तानचा खेळाडू नसीम शाहला (Naseem Shah)  एका मुलाखतीत उर्वशी रौतेलाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नावर त्याने उर्वशी कोण आहे हे मला माहीत नाही,असे उत्तर दिले होते. एकूणच त्याने तिला ओळखण्यास नकार दिला होता. यानंतर उर्वशी चांगलीच ट्रोल झाली होती. या ट्रोलिंगनंतर तिने पुन्हा एकदा इन्स्टाग्रामवर एक स्टोरी ठेवलीय. या स्टोरीत तिने त्या व्हिडिओवर स्पष्टीकरण दिले आहे. तसेच मीडियाला देखील आवाहन केले आहे. 
 
स्टोरीच्या पोस्टमध्ये काय? 
उर्वशी रौतेला (Urvashi Rautela)  इन्स्टा स्टोरीवर म्हणाली आहे की, ‘काही दिवसांपूर्वी माझ्या टीमने माझ्या आणि त्याच्याशी संबंधित फॅन मेड व्हिडिओ शेअर केला होता. यावर प्रसारमाध्यमांनी बातम्या बनवू नयेत, असे आवाहन तिने केले आहे. तसेच तुम्हा सर्वांचे आभार आणि लव्ह यु असे तिने शेवटी म्हटलेय. एकंदरीत तिने नसीम शाहसोबत तिचं नाव जोडणाऱ्या बातम्या बनवून नयेत असे मीडियाला म्हटले आहे. 

प्रकरण काय?
पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यानंतर वेगवान गोलंदाज नसीम शाह (Naseem Shah)  आणि बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) यांच नाव जोडलं जात होतं. उर्वशी रौतेलाने तिच्या इन्स्टा स्टोरीवर नसीम शाहचा एक व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये नसीम मैदानात हसताना दिसत आहे, तर उर्वशी त्याच्याकडे पाहून लाजत असल्याचे दिसले. या व्हिडिओनंतर दोघांचं सोशल मी़डियावर नाव जोडलं गेलं होतं. उर्वशी रौतेलाच्या फॅन पेजने हा व्हिडिओ बनवला होता. उर्वशीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर हा व्हिडिओ शेअर केला होता. 

या इन्स्टाग्राम स्टोरीनंतर नसीम शाह (Naseem Shah) आणि उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) यांच्याबाबत सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या बातम्या आणि व्हिडिओ समोर येत आहेत. आता नसीमने स्वतः पुढे येऊन याप्रकरणी खुलासा केला आहे. नसीमने एका मुलाखतीत स्पष्टपणे सांगितले की उर्वशी कोण आहे हे मला माहीत नाही.

नसीम शाह काय म्हणाला? 
नसीम शाह (Naseem Shah)  पुढे म्हणाला की, ‘खरं सांगायचं तर मला याबाबत काहीच माहिती नाही. मी माझा खेळ मैदानावर खेळतो. मला काही कल्पना नाही. जे मैदानात येऊन सामना बघतात, ही त्यांची मेहरबानी असते. जो कोणी मला आवडतो, ती चांगली गोष्ट आहे. मी काही आकाशातून आलो नाही आहे, माझ्यात विशेष काही नाही, पण लोक प्रेम करतात, त्यामुळे चांगली गोष्ट आहे,असे तो म्हणतोय. 

सोशल मीडियावर नसीम शाह आणि उर्वशी रौतेला यांचं नाव जोडलं जात असलं तरी या दोघांनी या नात्यास नकार दिला असल्याचे दोघांच्या प्रतिक्रियेवरून समजते आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *