Headlines

सावर्डी वन क्षेत्रात ऑक्सिजन पार्क निर्माण होणार – पालकमंत्री यशोमती ठाकूर

[ad_1]

अमरावती, दि. २९ : वनक्षेत्र विकास, पर्यावरण संवर्धनासाठी नाविन्यपूर्ण संकल्पना राबवणे आवश्यक असून, त्याअंतर्गत सावर्डी वन क्षेत्रात ऑक्सिजन पार्क निर्माण होणार आहे. येथील नैसर्गिक वनसंपदेचे रक्षण करतानाच एक सुंदर उपवन त्यानिमित्त उभे राहणार आहे, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज केले.

नांदगाव पेठनजीक वन वाटिका वनक्षेत्र सावर्डी निसर्ग अभ्यासिका क्षेत्रात ऑक्सिजन पार्क कामाच्या शुभारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या. उपवनसंरक्षक चंद्रशेखरन बाला, उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत, तहसीलदार संतोष काकडे, वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

वन क्षेत्र विकासाच्या अनुषंगाने १ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, वन क्षेत्र विकास व पर्यावरण संवर्धनासाठी अभिनव संकल्पना राबवणे आवश्यक आहे. त्यानुसार वनविभागाने नाविन्यपूर्ण संकल्पना अंमलात आणाव्यात. सावर्डी वन क्षेत्रात नैसर्गिक वनसंपदा जतन करतानाच बहुविध वृक्षसंपदेचा व आवश्यक सुविधांचा समावेश असलेले उपवन निर्माण करण्यात येईल. त्या दृष्टीने कार्यवाही वन विभाग प्रशासनाने गतीने करावी, असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले.

 

 

वनांची पाहणी

यावेळी पालकमंत्र्यांनी वन विभागाच्या सफारी वाहनातून व क्षेत्राची पाहणी केली. यावेळी त्यांनी वनक्षेत्र, वन्यजीवन, आवश्यक सुधारणांच्या अनुषंगाने करावयाची कार्यवाही याबाबत त्यांनी वन प्रशासनाकडून माहिती घेतली. त्याचप्रमाणे, पालकमंत्र्यांनी वनविभागाच्या रोपवाटिकेला भेट देऊन पाहणी केली.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *