राज्यात 5 ते 12 नोव्हेंबर या कालावधीत पक्षी सप्ताहसोलापूरात विविध कार्यक्रमाचे आयोजन

सोलापूर :- जनसामान्यांमध्ये राज्य प्राणी, पक्षी, वृक्ष, फुल, फुलपाखरू, कांदळ वन याबाबत जागृती व्हावी तसेच पक्षांबाबत विविध माहिती नागरिकांपर्यत पोहचावी यासाठी दिनांक 5 ते 12 नोहेंबर 2021 रोजी वन विभागामार्फत पक्षी सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती उपवनसंरक्षक धैर्यशिल पाटील यांनी दिली भारतीय पक्षीविश्व जागतिक स्तरावर पोहचविणारे डॉ.सलिम अली व वन्यजीव विषयक साहित्य निर्मिती अग्रणी असलेले सेवानिवृत्त वन अधिकारी मारुती चितमपल्ली यांच्या सन्मानार्थ पक्षी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

वन विभागाच्या वतीने पक्षी सप्ताह निमित्त सोलापुरात दिनांक 05 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर या कालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले असून, यामध्ये दिनांक 05 नोव्हेंबर 2021 रोजी शालेय विद्यार्थी गट व खुला गट यांच्या करीता निबंध स्पर्धा व घोषवाक्य स्पर्धा घेण्यात येणार आहेत. तर दिनांक 6 नोव्हेंबर 2019 रोजी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये 05 वर्ष ते 15 वर्ष या वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांकरिता ऑनलाइन स्पर्धेद्वारे [email protected] या ई-मेल वरती निबंध व चित्र मागवण्यात येणार आहेत.

तसेच दिनांक 7 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर 2021 या कालावधीत सोलापूर जिल्ह्यातील विविध शासकीय संस्था व निसर्गप्रेमी यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये पक्षी छायाचित्र, नागरिकांसाठी मार्गदर्शन, युवकांसाठी वन्यजीवांचे महत्व, पक्षी हा शेतकऱ्यांचा मित्र तसेच वन कर्मचारी यांच्यासाठी पक्ष्यां विषयक मार्गदर्शन इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ साहित्यिक श्री मारुती चित्तमपल्ली हे उपस्थित राहणार असल्याचेही उपवनसंरक्षक श्री पाटील यांनी सांगितले.

निबंध व घोषवाक्य स्पर्धेसाठीचे विषय

1) गवताळ प्रदेशात आढळणारे पक्षी 2) भारतीय संस्कृतीमधील पक्षी दर्शन 3) वातावरण बदलाचा पक्षी जीवनावर होणारा परिणाम हे विषय खुल्या गटासाठी राहणार आहेत. तर शालेय विद्यार्थ्यांसाठी 1) पक्षी आपले मित्र 2) माझा आवडता पक्षी 3)पक्षी सप्ताहाचे महत्व हे विषय राहणार आहेत. तर घोषवाक्य स्पर्धेत 1) पर्यावरण संवर्धन 2)शाश्वत विकास( पर्यावरणाबाबत) 3) वन्यजीव व पक्षीतसेच विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेत भारतात आढळणारे पक्षी हे विषय राहणार आहेत. ऑनलाईन स्पर्धेबाबत काही तांत्रिक अडचण आल्यास कार्यालयातील 8237002285 व 9595751084 या भ्रभणध्वनीवर संपर्क साधावा असे, आवाहनही उपवनसंरक्षक धैर्यशिल पाटील यांनी केले आहे.

Leave a Reply