Headlines

या अ‍ॅपवर LPG Cylinder बुक केल्यास मिळेल कॅशबॅक, पाहा बुकिंगची संपूर्ण प्रक्रिया

[ad_1]

नवी दिल्ली: LPG Cylinder Offer On Paytm: पेटीएम युजर्ससाठी एक भन्नाट ऑफर्स सध्या देण्यात येत आहे. युजर्सना वेळोवेळी नवीन ऑफर देणारे Appअशी पेटीएमची ओळख असून आता पेटीएम भारतगॅस, इंडेन आणि एचपी गॅसच्या एलपीजी सिलेंडर बुकिंगवर युजर्सना कॅशबॅक देत आहे. युजर्सचे आवडते डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म पहिल्या गॅस सिलिंडरच्या बुकिंगवर १५ रुपये कॅशबॅक आणि पेटीएम वॉलेटद्वारे बुकिंग केल्यास ५० रुपये कॅशबॅक देत आहे. युजर्स पेटीएमद्वारे बुकिंग ट्रॅक करण्यास सक्षम असतील. Paytm ने नुकतेच युजर्ससाठी नवीन कॅशबॅक ऑफर जाहीर केली आहे.

वाचा: पालकांनो द्या लक्ष ! या वयोगटातील मुलांचे Aadhar Card करावे लागेल अपडेट, पाहा संपूर्ण प्रोसेस

एलपीजी सिलेंडर बुक करणाऱ्यांसाठी ही एक उत्तम ऑफर आहे. पेटीएमवर नवीन युजर असल्यास १५ रुपयांचा कॅशबॅक मिळविण्यासाठी युजरला ‘FIRSTGAS’ कोड वापरावा लागेल. दुसरीकडे, जर तुम्ही पेटीएम वॉलेट वापरत असाल तर, युजर ‘WALLET50GAS’ कोड टाकल्यावरच तुम्हाला बुकिंगवर ५० रुपयांचा कॅशबॅक मिळेल.

वाचा: OnePlus चा शानदार स्मार्टफोन १२,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत येणार घरी, पाहा ऑफर

Paytm युजर्सना नोंदणीकृत फोन नंबरवर आणि अतिरिक्त शुल्क आकारून गॅस रिफिल बुक करण्याची परवानगी देत आहे. तुम्ही केव्हा बुकिंग केले आहे आणि सिलिंडर केव्हा मिळेल हे सुद्धा हे तुम्ही पाहू शकता. पेटीएम संपूर्ण प्रक्रिया दर्शवेल. पहिले बुकिंग होताच ते तुमच्या एलपीजी कनेक्शनचे संपूर्ण डिटेल्स सेव्ह करेल. जर तुम्ही दुसऱ्यांदा बुकिंगसाठी गेलात तर पुन्हा पुन्हा एलपीजी आयडी टाकण्याची गरज भासणार नाही.

पेटीएम सह असे करा बुकिंग:

पेटीएम उघडा आणि रिचार्ज आणि बिल पेमेंट श्रेणी अंतर्गत ‘Book Gas Cylinder’ टॅबवर जा. आता LPG सिलेंडर सेवा प्रदाता निवडा आणि नंतर तुमचा नोंदणीकृत मोबाइल क्रमांक/१७अंकी LPG ID/ग्राहक क्रमांक एंटर करा. पेमेंट करून तुमच्या बुकिंगसह पुढे जा. तुम्ही Paytm Wallet , पेटीएम यूपीआय, कार्ड आणि नेट बँकिंग यासारख्या पेमेंट पद्धतींमधून पैसे देऊ शकता. पेमेंट केल्यानंतर तुमचे बुकिंग निश्चित केले जाईल. त्यानंतर दोन ते तीन दिवसांत गॅस सिलिंडर मिळेल असे सांगण्यात येईल.

वाचा: चालतंय रे शंभरच आहे असे म्हणत Zomato आणि Swiggy वर आतापर्यंत किती खर्च केलाय ? असे करा माहित

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *