Headlines

Online Payment : चुकीच्या बँक खात्यात ट्रान्सफर झाले पैसे? रक्कम परत मिळवण्यासाठी फॉलो करा या टिप्स

[ad_1]

नवी दिल्ली :Transferred money to wrong bank account: स्मार्टफोन व इंटरनेटमुळे ऑनलाइन पेमेंटचे प्रमाण वाढले आहे. स्मार्टफोनच्या एका क्लिकवर कोणालाही अगदी एका सेकंदात पैसे पाठवणे शक्य आहे. तुम्ही अगदी घरबसल्या कोणाच्याही बँक खात्यात पैसे पाठवू शकता. ऑनलाइन पेमेंटमुळे वेळेची तर बचत होतेच, मात्र पैसे ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया देखील खूपच सोपी झाली आहे. परंतु, ऑनलाइन पैसे पाठवताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. अनेकदा चुकीच्या बँक खात्यात पैसे जमा होतात. पैसे पाठवताना बँक अकाउंट नंबर, IFSC कोड इत्यादी चुकल्यास पैसे दुसऱ्याच्या खात्यात जातात व मोठी समस्या निर्माण होऊ शकते.

वाचा: Smartphone Offers: OnePlus चा २४ हजारांचा पॉवरफुल ५जी स्मार्टफोन फक्त १३,५५० रुपयात खरेदीची संधी, पाहा ऑफर्स

पैसे इतरांच्या बँक खात्यात ट्रान्सफर झाल्यास परत कधी मिळणार? याची चिंता आपल्याला असते. RBI नुसार, कोणाच्याही बँक अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करण्याआधी रिसिव्हरच माहिती जसे की बँक अकाउंट नंबर, IFSC कोड, नाव इत्यादी माहिती तपासून घ्यावी. तुमच्याकडून जर चुकीच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर झाले असल्यास काळजी करण्याचे कारण नाही. आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही पैसे पुन्हा मिळवू शकता. याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

वाचा: Smartwatch: ७ दिवसांच्या बॅटरी लाइफसह Boat ची स्वस्त स्मार्टवॉच भारतात लाँच, पहिल्या १ हजार ग्राहकांना मिळेल डिस्काउंटचा फायदा

पैसे चुकीच्या बँक खात्यात जमा झाल्यास करा हे काम

  • पैसे चुकीच्या बँक खात्यात जमा झाल्यास सर्वात प्रथम तुमच्या बँकेच्या ब्रँचला भेट द्या. तुम्हाला कोणत्याही बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत, रक्कम किती होती, ही सर्व माहिती मॅनेजरला द्यावी लागेल. बँकेला माहिती दिल्याने त्वरित कारवाई करून तुम्हाला पैसे परत मिळण्यास मदत होईल. तुम्हाला लिखित अर्ज देखील द्यावा लागेल.
  • जर तुमचे व रिसिव्हरचे अकाउंट एकाच बँकेत असल्यास, बँकेकडून रिसिव्हरशी कॉल व ईमेलच्या माध्यमातून संपर्क साधला जातो. रिसिव्हरने परवानगी दिल्यास पैसे परत मिळवण्यासाठी प्रयत्न केले जातात. जर चुकीने रिसिव्हरच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर झाले आहेत व ती व्यक्ती पैसे परत देण्यास तयार असल्यास तुमची रक्कम ७ दिवसांच्या आत परत मिळेल.
  • रिसिव्हरने पैसे परत करण्यास नकार दिल्यास? असा प्रश्न निर्माण होतो. अशा स्थितीमध्ये तुम्हाला कायदेशीर पद्धतीने पुढे जावे लागेल. तुम्ही FIR नोंदवून देखील पैसे परत मिळवू शकता. मात्र, लक्षात ठेवा की नकळत चुकीच्या बँक अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर झाल्यास, त्वरित तुमच्या बँकेला याबाबत माहिती द्या. यामुळे पैसे परत मिळवण्यास तुम्हाला मदत होईल.

वाचा: Flipkart Sale: फ्लिपकार्टवर सुरू आहे खास सेल, दरमहिना फक्त हजार रुपये देऊन खरेदी करा ब्रँडेड एसी; पाहा ऑफर्स

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *