Headlines

Oh my god… ड्रीम गर्ल हेमा मालिनीची संपत्ती वाचून तुमचेही डोळे होतील पांढरे!

[ad_1]

Hema Malini Net Worth: आपल्या मोहक सौंदर्यांनं आणि दिलखेचक नृत्यानं सर्वांचीच मनं जिंकून घेणाऱ्या हेमा मालिनी (Hema Malini Birthday) यांचा आज, 16 ऑक्टोबर, 74 वा वाढदिवस आहे. हेमा मालिनी या बॉलीवूडमधल्या सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहेत. लहानपणापासून नृत्याची आवड असलेल्या हेमा मालिनी (Hema Malini Dance) यांनी आपली वेगळी ओळख नृत्यक्षेत्रात निर्माण केली आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्यांच्याबद्दलचे काही इंटरेरिस्ट फॅक्ट्स. त्यापुर्वी जाणून घेऊया अभिनेत्रीपासून राजकारणीपर्यंत प्रवास करणाऱ्या हेमा मालिनींची संपत्ती (Hema Malini Net Worth) किती आहे? (hema malini birthday net worth sunny deol dharmendra husband wife)

आजही हेमा मालिनी यांच्या त्यांचे चाहते जीव ओवाळून टाकतात. हेमा मालिनी यांनी त्यांच्या कारकीर्दीमध्ये अनेक उत्तोमोत्तम सिनेमे केले आहेत, ज्यातील बहुतेक चित्रपट हे धर्मेंद्र (Hema Malini and Dharmedra Films) यांच्यासोबत आहेत. दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. एकत्र काम करतानाच त्यांचे एकमेकांबद्दलचे प्रेम फुलु लागले. बस मग काय… धर्मेंद्र यांनी हेमा यांच्याशी लग्न केले. हे धर्मेंद्र यांचे दुसरे लग्न आहे. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की हेमा या प्रॉपर्टीच्या बाबतीत धर्मेंद्र आणि त्यांचा मुलगा सनी देओल यांच्यापेक्षा खूप पुढे आहेत. 

आणखी वाचा – गव्हापासून नाही तर चण्याच्या डाळीच्या पोळ्या ठरतील आरोग्यदायी… पाहा फायदे

सनी देओल (Sunny Deol Net Worth) हा धर्मेंद्रच्या पहिल्या पत्नीचा मुलगा आहे. तो हेमा यांचा सावत्र मुलगा आहे. सनी देओल हा बॉलीवूडचा सुपरस्टार देखील आहे पण संपत्तीच्या बाबतीत तो त्याची आई हेमा यांच्याही मागे पडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सनीची एकूण संपत्ती 83 कोटी रुपये आहे. त्यांच्यावर 53 कोटी रुपयांचे कर्ज असून त्यांच्याकडे 60 कोटी रुपयांची जंगम आणि 21 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. याशिवाय सनी देओलच्या बँक खात्यात जवळपास 9 लाख रुपये आणि जवळपास 26 लाख रुपये रोख आहेत. पत्नी पूजाकडेही 6 कोटींची संपत्ती आहे. त्यापैंकी 19 लाख बँकेत तर 16 लाख रोख आहेत. 

आणखी वाचा – Aryan आणि Suhana Khan खानला पाहून नेटकऱ्यांचा संताप; ‘एअरपोर्टवर…’

हेमा यांची एकूण संपत्ती किती? 

हेमा मालिनी पती धर्मेंद्र यांच्यापेक्षा श्रीमंत आहेत. 2019 च्या निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात हेमा मालिनी यांनी त्यांच्या एकूण संपत्तीचा तपशील दिला होता. त्यानुसार त्यांच्याकडे एकूण 249 कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यापैंकी 114 कोटींच्या त्या मालकीण असून 135 कोटी पती धर्मेंद्र यांचे आहेत. पण इथे हेही जाणून घ्यायला हवे की हेमा यांच्या संपत्तीत गेल्या काही वर्षांत सुमारे 72 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. 

हेमा यांनी 2014 मध्ये दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे सुमारे 178 कोटी रुपयांची संपत्ती होती. यामध्ये त्यांचे पती धर्मेंद्र यांच्या मालमत्तेचाही समावेश होता. याशिवाय हेमा यांच्याकडे 5.61 लाख रूपये असल्याचीही माहिती आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *