Headlines

महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा संप सुरू

बार्शी /-प्रतिनिधी- महाराष्ट्र महाविद्यालय व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समिती यांच्या नेतृत्वाखाली शिक्षकेतरांच्या शासनाकडील प्रलंबित मागण्यासाठी राज्यभर पुकारण्यात आलेल्या संपामध्ये बार्शी मधील श्री शिवाजी महाविद्यालय, झाडबुके महाविद्यालय, बीपी सुलाखे कॉमर्स कॉलेज, एज्युकेशन कॉलेज येथील शिक्षकेतर कर्मचारी दिनांक 18 डिसेंबर 2021रोजी पासून बेमुदत संपावर गेले आहेत. यामध्ये महाविद्यालय शिक्षकेतर महासंघ, आयटक संलग्न विद्यापीठ व संलग्न महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटना, सोलापूर विद्यापीठ शिक्षकेतर संघटना सहभागी झाल्या आहेत.

आश्वासित प्रगती योजनेचे रद्द झालेले जीआर पुर्नजिवीत करावेत, दहा वीस तीस वर्ष लाभांची आश्वासित प्रगती योजना, 796 विद्यापीठ कर्मचारी पदांना सातवा वेतन आयोग, 58 महिन्याचा फरक, पाच दिवसांचा आठवडा व इतर मागण्या संपामध्ये करण्यात आल्या आहेत.

मा.उच्च शिक्षण मंत्री यांनी दोन वर्ष आश्वासित प्रगती योजनेचा जीआर पुनरुज्जीवित करू असे आश्वासन दिले आहे, परंतु त्या आश्वासनाची पूर्तता करीत नाहीत याचा फटका म्हणून सातवा वेतन आयोगाचा लाभ महाविद्यालय कर्मचाऱ्यांना मिळत नाही, गेली एक महिना अगोदर संप पुकारला गेला आहे परंतु शासन यावर ठोस उत्तर देण्यास तयार नाही त्यामुळे हा संप शासनाने शिक्षकेतर कर्मचार्‍यांवर लादला आहे, जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी हा संप बेमुदत चालू ठेवतील असे आयटक संघटनेचे सचिव तसेच शासन समिती सदस्य कॉम्रेड डॉ. प्रवीण मस्तुद यांनी सांगितले आहे.

यावेळी सुटाचे प्रा. डॉ. वशिष्ठ गुरमे, प्रा. पवार एस डी, भिसे डीएस यांनी पाठिंबा नोंदवला. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी पीटी पाटील, बापू शितोळे यांनी देखील पाठिंबा नोंदवला.

हा संप यशस्वी करण्यासाठी महासंघाचे भीमा मस्के आयटकचे गणेश करंजकर कॉम्रेड डॉ. प्रवीण मस्तुद, उमेश मदने, सुधीर सेेवकर, अशोक पवार, आनंद देशमुख, शिवाजी हाके, सौ कासार, मोळवणे एस एस, शिंदे, चंद्रकांत गव्हाणे, संदीपान पिंगोरे, भाऊ लांडगे, एसडी महाडिक, सूर्यकांत घोलप, दीपक शिर्के, विक्रांत काकडे, स्वामी, वाघमारे एस एस, शेळके संभाजी, राजाभाऊ वेदपाठक आदी सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *