Headlines

No matter what happens do not lose patience do not cry anymore fight Uddhav Thackerays appeal to the affected farmers msr 87

[ad_1]

शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे परतीच्या पावसाने पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या भेटीसाठी आजपासून(रविवार) मराठवाडा दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी औरंगाबादमधील दहेगावात जाऊन शेतीच्या नुकसानीची पाहणी केली व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवादही साधला. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या व्यथा उद्धव ठाकरेंसमोर मांडल्या.

हेही वाचा : “उद्धव ठाकरे २४ मिनिटे शेतकऱ्यांची विचारपूस करणार, आता यावेळेत ते…”; अब्दुल सत्तारांनी साधला निशाणा!

यावेळी शेतकऱ्यांना उद्देशून उद्धव ठाकरे म्हणाले, “काही झालं तरी तुम्ही धीर सोडू नका. आम्ही तुमच्यासोबत आहोत. आता रडायचं नाही आता लढायचं. संकटं येत असतात त्या संकटांना सामोरं जायचं, मी तुमच्यासोबत आहे. शिवसेना तुमच्यासोबत आहे. संकटं आले तेव्हा तुम्ही एकवटा. तुमच्या हातातील आसूड हा केवळ हातात घेऊन फिरून नका, त्याचा योग्य वेळी वापरही करा.”

“त्यांनी नक्कीच रस्त्यावर उतरावं, रस्त्यावर उतरण्याचीच वेळ आली आहे; ज्यावेळी रस्त्यावर यायला पाहिजे होतं, त्यावेळी…”

याशिवाय “करोना लॉकडाउनच्या काळात अर्थव्यवस्था ठप्प असताना, शेतकरी जर उभा राहीला नसता तर आपल्या राज्याचं अर्थचक्र फिरलं नसतं. शेतीने त्यावेळी आपल्या अर्थव्यवस्थेला सांभाळलं. सरकाराल आपण तुम्हाला मदत देण्यासाठी कसंही करू भाग पाडू. कारण आता शेतकरी अडचणीत आहे, त्याला आधार मिळाला पाहिजे.” असंही उद्धव ठाकरेंनी यावेळी बोलून दाखवलं.

हेही वाचा : …याची जबाबदारी घेऊन आज शेतकऱ्यांसमोर माफी मागणार का? – उद्धव ठाकरेंना भाजपाचा सवाल!

उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्यावरून राज्यातील राजकारण चांगलंच रंगताना दिसत आहे. कारण, भाजपा व शिंदे गटाच्या मंत्री व नेत्यांकडून ठाकरेंच्या या दौऱ्यावर टीका-टिप्पणी सुरू आहे तर शिवसेना नेतेही सत्ताधाऱ्यांना प्रत्युत्तर देत आहेत. त्यामुळे या दौऱ्यात उद्धव ठाकरे राज्य सरकारला उद्देशून काय म्हणतात, सरकारकडे काय मागणी करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *