Headlines

 ‘एनआयआरएफ’च्या यादीत राज्यातील बारा संस्था

[ad_1]

पुणे : राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी आराखडय़ातील (एनआयआरएफ) सर्वसाधारण यादीतील पहिल्या शंभर उच्च शिक्षण संस्थांमध्ये राज्यातील बारा संस्थांनी स्थान मिळवले आहे. क्रमवारीमध्ये आयआयटी मुंबई वगळता राज्यातील अन्य संस्थांच्या स्थानांमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा लक्षणीय चढ-उतार झाल्याचे दिसून येते. त्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची घसरण झाली, तर मुंबई विद्यापीठाने मोठी झेप घेतली आहे. 

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेद्र प्रधान यांनी २०२२ साठीची एनआयआरएफ क्रमवारी शुक्रवारी जाहीर केली. संशोधन आणि व्यावसायिकता, अध्ययन आणि स्रोत, अध्यापन, प्रचार आणि सर्वसमावेशकता अशा निकषांवर देशभरातील संस्थांचे मूल्यमापन करण्यात आले. आयआयटी मद्रास, बेंगळुरूची इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स, आयआयटी मुंबई, आयआयटी दिल्ली, आयआयटी कानपूर, आयआयटी खरगपूर, आयआयटी रूरकी, आयआयटी गुवाहाटी, दिल्लीची ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेस आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठ या संस्था देशातील पहिल्या दहा संस्थामध्ये आहेत. राज्यातील शिक्षण संस्थांचा विचार केल्यास आयआयटी मुंबईने गेल्यावर्षीप्रमाणेच यंदाही तिसरे स्थान कायम राखले आहे. तर अन्य संस्थांच्या क्रमवारीत उलथापालथ झाली आहे. 

गेल्यावर्षी ३६व्या स्थानी असलेल्या होमी भाभा नॅशनल इन्स्टिटय़ूटने यंदा ३३वे, ६८व्या स्थानी असलेल्या पुण्याच्या सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाने ६२वे, ८०व्या स्थानी असलेल्या पुण्याच्या डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाने यंदा ७६वे, ९४व्या स्थानी असलेल्या मुंबईच्या नरसी मोन्जी इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजने यंदा ८९वे, ९६व्या स्थानी असलेल्या मुंबई विद्यापीठाने यंदा ८१वे, १००व्या स्थानी असलेल्या वर्ध्याच्या दत्ता मेघे इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेसने यंदा ९२वे स्थान मिळवत कामगिरी उंचावली. तर २०व्या स्थानी असलेले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यंदा २५व्या, २४व्या स्थानी असलेल्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रीसर्चला (आयसर पुणे) यंदा २६वे, २८व्या स्थानी असलेल्या मुंबईच्या इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल इन्स्टिटय़ूटने यंदा २८वे,  ५४व्या स्थानी असलेल्या नागपूरच्या विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉल़ॉजीने यंदा ६८वे, ७०व्या स्थानी असलेल्या टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेसला यंदा ९९वे स्थान मिळाले.

नक्की वाचा >> “जर मुलं सात वाजता शाळेत जाऊ शकतात, तर न्यायाधीश नऊ वाजता कामाला सुरुवात का करु शकत नाहीत?”

संशोधन संस्थांतील पहिल्या पन्नास संस्थांमध्ये आयआयटी मुंबई चौथ्या, इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी ११व्या, टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ फंडामेंटल रीसर्च १७व्या, होमी भाभा नॅशनल इन्स्टिटय़ूट १७व्या, आयसर पुणे, इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी २५व्या स्थानी आहे. अभियांत्रिकी संस्थांच्या गटात आयआयटी मुंबई, इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉल़ॉजी, डिफेन्स इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे यांना पहिल्या शंभर संस्थांमध्ये स्थान मिळाले आहे. वैद्यकीय संस्था गटातील पहिल्या पहिल्या पन्नास संस्थांमध्ये डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, दत्ता मेघे इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेस, कराडचे कृष्णा इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेस, मुंबईचे पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ यांचा समावेश आहे.

विद्यापीठ, महाविद्यालय गट

विद्यापीठ गटातील पहिल्या पन्नास विद्यापीठांत राज्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला १२ वे, मुंबईचे इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीला १४वे, मुंबईचे होमी भाभा नॅशनल इन्स्टिटय़ूटला १७ वे, पुण्याचे सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाला ३२वे, पुण्याचे डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाला ४१वे, मुंबई विद्यापीठाला ४५वे यांनी स्थान मिळाले. महाविद्यालय गटातील पहिल्या शंभर संस्थांमध्ये पुण्याचे फग्र्युसन महाविद्यालय ५७व्या, मुंबईचे कॉलेज ऑफ सोशल वर्क ६९व्या, मुंबईचे सेंट झेवियर्स ८७व्या स्थानी आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *