Headlines

ncp mla amol mitkari Criticized devendra Fadnavis tweet on international Tiger day spb 94

[ad_1]

जागतिक व्याघ्र दिनानिमित्त आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत वाघांचे संवर्धन करणे ही काळाची गरज असल्याचे म्हटले. यावरून आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. फडणवीसांचे हे ट्वीट म्हणजे ”आग सोमेश्वरी आणि बंब रामेश्वरी अशा आशयातचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांची भेट घेतल्यानंतर राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “त्यांच्याकडून जरा निष्ठेच्या…”

नेमकं काय म्हणाले अमोल मिटकरी?

आज जागतिक व्याघ्र दिन आहे. या निमित्त शुभेच्छा देताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाघांचे संवर्धन झाले पाहिजे, अशा प्रकारचे ट्वीट केले आहे. त्यांचे हे ट्वीट म्हणजे ‘मुह मे राम, बगलमे सुरी’ अशा आशयाचे आहे. शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर या सरकारने मेट्रो कारशेड आरेत करण्याचा निर्णय घेतला. हा परिसर म्हणजे मुंबईचा ऑक्सिजन आहे. येते पट्टेदार वाघ, बिबट्यांचा संचार असतो. अशा जंगलावर कुऱ्हाड मारणे आणि दुसरीकडे व्याघ्र दिनानिमित्त शुभेच्छा देणे ही दुटप्पीपणाची भूमिका आहे. हा प्रकार म्हणजे आग सोमेश्वरी आणि बंब रामेश्वरी असा आहे, अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली आहे.

दरम्यान, आज जागतिक व्याघ्र दिनानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करून शुभेच्छा दिल्या आहेत. वाघांचे संवर्धन करणे ही काळाची गरज असल्याचे फडणवीस यांनी म्हटले यावरून अमोल मिटकरी यांनी त्यांच्यावर टीकास्र सोडले.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *