Headlines

Navratri 2022 : देवीच्या रुपानं घरात आलेल्या महिलांना कुंकू लावताना ‘या’ चुका करु नका

[ad_1]

Navratri 2022 : गेल्या काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या नवरात्रोत्सवाच्या दिवसांमध्ये महिलांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. घरोघरी, मंडळांमध्ये देवीच्या मूर्ती आणि घटस्थापना करण्यात आली आहे. इतकंच नव्हे तर, देवीची उपासना करत विविध प्रकारे तिची पूजाही मांडण्यात येत आहे. स्त्रीशक्तीचा जागरच जणू या दिवसांमध्ये घातला जात आहे. नवरात्रोत्सवादरम्यान कुमारिका पूजन (Kumarka Pujan), सुवासिनी पूजन अशाही बऱ्याच गोष्टी पाहायला मिळतात. तुम्हालाही अशा एखाद्या कार्यक्रमाचं आमंत्रण मिळालंच असेल. 

अशाच कार्यक्रमांनंतर जेव्हा तुम्हाला हळदी कुंकू (Haldi kumkum) लावण्यासाठी कोणी पुढे येईल तेव्हा तुम्हीही त्यांना हळद- कुंकू करण्यास विसरू नका. नवविवाहित मुलींनी ही बाब लक्षात ठेवा आणि न गोंधळता पाहा कुंकू लावण्याची योग्य पद्धत. (navratri 2022 kumarika pujan right way to put kumkum and haldi know details)

कसं लावावं कुंकू? (Right way to put kumkum)

सहसा कुंकू उजव्या हाताच्या अनामिकेनं लावावं. असं केल्यास कुंकवामध्ये असणाऱ्या सकारात्मक उर्जा (Positive Energy) आपल्या शरीरात संचारतात. सकाळी महिलांनी अंघोळीनंतर स्वत:च्या कपाळावर कुंकू लावावं. 

एखाद्या ठिकाणी गेलं असता तुम्हाला दुसऱ्या महिलेला कुंकू लावायचं झाल्यास मध्यमेचाच वापर करा, असं शास्त्रात सांगितलं आहे.

 

असं म्हणतात की आपण जेव्हा दुसऱ्या व्यक्तीच्या सानिध्ध्यात येतो तेव्हा त्यांच्या सकारात्मक आणि नकारात्मक उर्जाही आपल्यापर्यंत पोहोचतात. हाताच्या बोटांमधून या शक्ती शरीरात जाण्याची दाट शक्यता असते. त्यामुळं हे सर्व थांबवण्याचं बळ मध्यमात आहे. त्यामुळं इतरांना कुंकू लावताना याच बोटाचा वापर करावा. 

सहसा कुंकू दोन भुवयांच्या मध्यभागी लावण्याचा सल्ला देण्यात येतो. त्यामागेही एक महत्त्वाचं कारण असल्याचं कळतं. कपाळाच्या मध्यभाही शरीराचे काही बिंदू असतात. या बिंदूंमध्ये शरीराचा समतोल राखण्याची ताकद असते. परिणामी कुंकू दोन भुवयांच्या मध्यभागी लावावं. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *