Headlines

राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने “स्ञी शक्ती हिरकणी ” कार्यक्रमाचे आयोजन

बार्शी / प्रतिंनिधी – तालुक्यातील आगळगाव येथील विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात  महिला दिन व ज्ञानज्योती सविञीबाई फुले यांच्या  पुण्यतिथीचे औचित्य साधून राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस पक्ष, बार्शी तालुका यांनी “स्ञी शक्ती हिरकणी ” कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात महिला शेतकरी , आरोग्य कर्मचारी अशा विविध क्षेत्रातील ४० महिलांचा  सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना सुवर्णा शिवपुरे म्हणाल्या स्त्रियांनी संसारासोबत आरोग्य जपावे.विक्रम सावळे म्हणाले की स्त्रिशक्ती ही सर्वश्रेष्ठ शक्ती असून कायम सर्वश्रेष्ठ असणार . स्ञीचे मातृत्व हे तिला देवाने दिलेले वरदान आहे. स्ञी ही संघर्षांसाठी संयमाने साथ देते.

आजतायगत ग्रामीण भागातील महिलांचा सन्मान सत्कार केला गेला नव्हता परंतू आपण हा उपक्रम केला व आम्हास येवढा मान दिला त्याबद्दल आम्हाला खुप अभिमान वाटत आहे – रतनताई चोरगडे (आशा गट पर्यवेक्षक)

कार्यक्रमासाठी पक्षाचे पदाधिकारी संतोष डमरे, आगळगाव ग्रामपंचायत माजी सरपंच विश्वनाथ जाधव, माजी उपसरपंच सुनिल माने, सरपंच पुतळाताई गरड, विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे पंच कमिटी दिलीप (बप्पा) डमरे, राष्ट्रवादीचे जिल्हा प्रवर्तक व सरचिटणीस विक्रमदादा सावळे, सुवर्णाताई शिवपुरे, राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या सर्व युवती पदाधिकाऱ्यांसह, ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुञसंचालन युवती उपाध्यक्ष तृप्ती खडतरे यांनी केले. स्नेहा निंबाळकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन व संयोजन करत महिलांच्या संघर्षांचे कौतुक केले. आरोग्य कर्मचारी व अंगणवाडीतील महिलांचे कोरोना काळात केलेल्या कार्याची दखल घेत महिलांना प्रोत्साहन देत व आभार मानत स्नेहा निंबाळकर यांनी  कार्यक्रमाची सांगता केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *