Headlines

काय आहे ई- श्रम योजना ? कोणाला आणि कसा होणार फायदा ? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकारने ई श्रम पोर्टल लॉन्च केले आहे. या वेबसाईट द्वारे असंघटित क्षेत्रातील कामगारांना दोन लाख रुपया पर्यंतचा लाभ मिळू शकतो.

असंघटित क्षेत्रातील सर्व नोंदणीकृत कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अंतर्गत अपघाती विमा संरक्षण दिले जाईल ,जो एका वर्षासाठी असेल. अपघाती मृत्यू आणि कायमस्वरूपी अपंगत्व या परिस्थितीमध्ये दोन लाख रुपये दिले जातील. तात्पुरत्या अपंगत्व साठी एक लाख रुपये देण्याची ची तरतूद करण्यात आली आहे.

केंद्र सरकार देशातील 38 करोड असंघटित कामगारांची नोंदणी करू इच्छित आहे. यामध्ये शेतकरी व शेतमजूर , बांधकाम कामगार, भाजी आणि फळ विक्रेते , वाहन चालक सर्व प्रकारचे असंघटित कामगार या वेब पोर्टल द्वारे स्वतःची नोंदणी करू शकता. नोंदणी झाल्यानंतर बारा मिनिटाचा एक स्पेशल कार्ड मिळेल.

अशा पद्धतीने करा नोंदणी –
इ – श्रम पोर्टलवर स्वतःची नोंदणी करणे खूप सरळ , साधे , आणि सोपे आहे. यासाठी आपणास खालील प्रक्रियेचा अवलंब करावा लागेल.

सर्वात आधी ई श्रम च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. लिंक – https://eshram.gov.in

यानंतर रजिस्टर ओन आश्रम या या पर्यायावर क्लिक करा.

इथे आपल्याला सेल्फ रजिस्ट्रेशन ब्लॉक हा ऑप्शन दिसेल. त्यामध्ये आधार कार्डची जोडलेला मोबाईल नंबर टाकावा लागेल.

मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्या मोबाईल वर ओटीपी येईल. तो ओटीपी खाली दिलेल्या बॉक्समध्ये प्रविष्ट करावा.

यानंतर पुढे नवीन पान ओपन होईल. त्यावर विचारलेली माहिती काळजीपूर्वक व न चुकता भरावी.

पूर्ण माहिती भरल्यानंतर आपल्याला ई-श्रम कार्ड डाऊनलोड करता येईल.

रजिस्ट्रेशन साठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे – आधार कार्ड , आधार कार्डशी संलग्न असणारा मोबाईल नंबर , बँक पासबुक , ज्या व्यक्तीची नोंदणी करणार आहोत त्या व्यक्तीचे वय १८ वर्ष ते ५९ वर्ष यामध्ये असायला हवे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *