Headlines

नांदेड – पनवेल गाडीला बार्शी येथे थांबा द्यावा , लवकरात लवकर पादचारी पूल बांधण्यात यावा – रेल्वे प्रवासी ग्रुप

बार्शी – उस्मानाबाद लोकसभा मतदार संघाचे खासदार मा. ओमराजे निंबाळकर यांना रेल्वे प्रवासी ग्रुप बार्शी यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. बार्शी कृषि उत्पन्न बाजार समिति च्या विविध विकास कामाच्या लोकार्पन सोहोळ्याच्या निमित्त खासदार ओमराजे निंबाळकर बार्शी मध्ये आले होते. यावेळी रेलवे प्रवासी सेल चे अध्यक्ष शैलेश वखारिया यांनी त्यांच्याशी बार्शी परिसरातील रेल्वे प्रवाशांच्या समस्या व मागण्यांबाबत चर्चा केली.

यावेळी माहिती देताना शैलेश वखारिया यांनी संगितले की, प्रवासी संख्या कमी असल्याचे कारण देऊन रेल्वे प्रशासनाने नांदेड पनवेल- नांदेड एक्स. चा बार्शी रेलवे स्टेशन वरील थांबा रद्द केला. परंतु वास्तविक परिस्थिति पहाता नांदेड-पनवेल नांदेड एक्स. ही गाडी प्लॅटफॉर्म नं. 2 वर येत होती. प्लॅटफॉर्म नं. 2 वरुण प्लॅटफॉर्म नं. 1 वर येण्यासाठी पादचारी पूल नसल्याने प्रवाशांची खूप गैरसोय होत होती. या गाडीने येणाऱ्या प्रवाशांना सामान घेऊन, लहान मुले, वृद्ध प्रवासी यांना जीव मुठीत घेऊन रेल्वे लाईन ओलांडून येण्याशिवाय पर्याय नव्हता. यामुळे नांदेड पनवेल- नांदेड ही गाडी बार्शीवरून परळी, परभणी, नांदेड, पुणे, पिंपरी-चिंचवड, तळेगाव, पनवेल व मुंबई येथे जाण्या-येण्यासाठी सोयिस्कर असून देखील प्रवाशांनी याकडे पाठ फिरवली.

बार्शी रेलवे स्टेशन येथे पादचारी पूल उभारल्यास प्रवाशांची खूप मोठी गैरसोय दूर होणार असून रेल्वे प्रशासन व प्रवासी यांना खूप फायद्याचे ठरणार आहे. बार्शी रेल्वे स्टेशन येथे गेल्या 1 वर्षापासून पादचातरी पुलाचे सामान येऊन पडले आहे. पण रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ कारभारमुळे हा पादचारी पूल होऊ शकला नाही. त्यामुळे हा पादचारी पूल लवकरात लवकर उभारावा व नांदेड- पनवेल- नांदेड एक्स. गाडीचा बार्शी थांबा पूर्ववत सुरू करावा ही महत्वाची मागणी आहे.

त्याचबरोबर लातूर- पुणे इंटर्सिटी एक्स. सुरू करणे, बार्शी रेल्वे स्टेशन च्या प्लॅटफॉर्मवर कोच इंडिकेटर बसवणे या देखील मागण्या आहेत. दक्षिणेमधून सोलापूर मार्गे गुजरात, राजस्थान व उत्तरभारतमध्ये जाणाऱ्या गाड्यांना कुर्डूवाडी जंक्शन येथे थांबा द्यावा ही पण एक प्रमुख मागणी आहे. सध्या लातूर, उस्मानाबाद, बार्शी या भागातून गुजराथ, राजस्थान व उत्तरभारतमध्ये प्रवास करायचा असल्यास सोलापूर रेल्वे स्टेशन येथे जावे लागते.

आधीच सोलापूर रेल्वे स्टेशन वर खूप ताण आहे. या गाड्यांना कुर्डूवाडी येथे थांबा दिल्यास सोलापूर रेल्वे स्टेशन वरील ताण कमी होण्यास मदतच होणार आहे. त्याचबरोबर लातूर, उस्मानाबाद, बार्शी या भागातिल प्रवाशांची पण सोय होणार आहे. यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी याबाबतीमध्ये जातीने लक्ष घालून बार्शी रेल्वे स्टेशन येथे प्रवाशांना जास्तीतजास्त सुविधा मिळण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *