Headlines

वैराग येथील कब्रस्तानप्रश्नी मुस्लिम समाज आक्रमक , तीव्र आंदोलनाचा इशारा

वैराग नगरपंचायतने बार्शी तहसीलदारांच्या आदेशाला दाखवली केराची टोपली ?

बार्शी/प्रतिनिधी – वैराग येथे सकल मुस्लीम समाजाने वैराग पोलीस स्टेशन समोरील कब्रस्थान येथे स्वच्छता करने व अतिक्रमण हटवने बाबत तीव्र आंदोलनाचा ईशारा नगरपंचायत मुख्याधिकारी यांना शुक्रवार रोजी निवेदनाद्वारे दिला.

निवेदनात म्हटले आहे की वैराग येथिल पोलीस स्टेशन समोरील सोलापुर रोड लगतचे मुस्लिम कब्रस्थान गट नं 394 मधील स्वच्छता करून अतिक्रमण हटवणे बाबत बार्शी तहसीलदार यांनी २३ जून २०२१ रोजी आदेश दिला होता. तरी १५ दिवस उलटून गेल्या नंतर सुध्दा नगरपंचायतच्या वतीने आदेशाचे पालन करण्यात आले नाही. त्या आदेशाला नगरपंचायतने केराची टोपली दाखवली आहे.

सदरील कब्रस्थान बाबत दोन दिवसात कारवाई न झाल्यास मुस्लिम समाजाच्या वतीने आंदोलन व उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. जमीर शेख , अहमद शेख , गालीफ शेख,शौकत पठाण , बाबा शेख शेख , यांच्या निवेदनावर स्वाक्षरी आहेत. यावेळी बबलू बागवान, रफिक बेग,नूर बागवान, महमंद शेख,याकूब बागवान, सादीक शेख,मौलाना कादर मिरजा उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *