‘मुन्नाभाई MBBS’ मधील ‘स्वामी’ आठवतोय? पाहा, तो सध्या काय करतो


मुंबई : अभिनेता संजय दत्त, सुनील दत्त आणि इतर बऱ्याच कलाकारांच्या अभिनयानं नटलेला एक अफलातून चित्रपट 2003 ला आपल्या भेटीला आला. खळखळून हसायला, जादू की झप्पी द्यायला याच चित्रपटानं आपल्याला शिकवलं. आठवतंय का नाव? (sanjay dutt movie)

‘मुन्नाभाई एमबीबीएस’ हा तोच चित्रपट ज्यानं काही दमदार पात्र आपल्यापर्यंत आणली. चित्रपटातील मुन्ना असो किंवा सक्रिट, डॉक्टर अस्थाना असो किंवा मग चिंकी, प्रत्येक कलाकार प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेताना दिसला. 

बहुविध कलाकारांची गर्दी असणाऱ्या या चित्रपटामधील लक्षात राहिलेला असाच एक चेहरा म्हणजे, ‘स्वामी’चा. 

अभिनेता Khurshed Lawyer यानं या चित्रपटामध्ये साकारलेल्या भित्रा, अभ्यासू स्वामी कोणीही विसरलेलं नाही. सध्या स्वामी काय करतो, तो कुठे असतो असेच प्रश्न लगेचच तुम्हाहाही पडले ना? 

‘अजब प्रेम की गजब कहानी’, ‘प्यारे मोहन’, ‘डबल धमाल’ अशा चित्रपटांतून कुर्शिद झळकला होता. पण, त्याच्या नावाची चर्चा आता जरा जास्त होत आहे. 

निमित्त ठरतंय ती म्हणजे तिग्मांशू धुलिया यांची वेब सीरिज the great indian murder. यामध्ये 4 वर्षांनंतर कुर्शिद प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 

एसा सोशल मीडिया पेजवर त्याचे सध्याचे फोटो शेअर करण्यात आले. जिथं त्याचं बदललेलं रुप पाहताना, हाच तो स्वामी… असंच आपण आश्चर्यानं म्हणतो. 

काळ आणि वेळ बदलला तसा हा स्वामीही बदलला, पण त्यानं साकारलेली भूमिका मात्र आजही तितकीच तरुण आहे हे मात्र नाकारता येणार नाही.  Source link

Leave a Reply