Headlines

बहुपर्यायी निवड प्रश्न परीक्षापद्धतीसाठी विद्यार्थ्यांचे सोलापूर विद्यापीठावर धरणे आंदोलन!

सोलापूर दिनांक – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या शहर जिल्ह्यातील महाविद्यालयातील बहुतांश विद्यार्थ्यांची आग्रही मागणी ही आहे की,
कोरोना विषाणू प्रादुर्भाव आटोक्यात आल्यानंतर महाराष्ट्र राज्य सरकारने कोरोना विषाणू निर्बंध 1 एप्रिल रोजी हटवले.यानंतर कमी अधिक प्रमाणात महाविद्यालय महाराष्ट्र राज्य सरकारच्या आरोग्य विभागा कडून लागू केलेल्या संबंधित सूचनांचे पालन सुरू केले.
तथापि विद्यापीठातील सर्व शाखांतील कला,शास्त्र,वाणिज्य, विधी, अभियांत्रिकी,व्यवसायिक व्यवस्थापन व अन्य शिक्षणक्रम शी निगडीत पदविका,पदवी,पदव्युत्तर च्या विद्यार्थ्यांसाठी निर्धारीत असणारे अभ्यासक्रम,त्याचा अध्यापन कालावधी, विद्यार्थ्यांचे आकलन, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरातील महाविद्यालयात येण्यासाठी लागणारी दळणवळणाची साधने, महाविद्यालयात झालेल्या तासिका तसेच अत्यंत गांभीर्याने नोंद घेतली पाहिजे होती तशी ती घेतली गेली नाही. ही बाब म्हणजे दीड वर्षाच्या प्रदीर्घ खंडीत कालावधीनंतर सामोरे जावे लागत असणारी ऑफलाईन परीक्षा या सर्व बाबी विद्यार्थ्यांवर एक प्रकारचे मानसिक दबाव वाढवणारे आहे.ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन या वर्षीच्या जून-जुलै दरम्यान ची परीक्षा ही बहुपर्यायी निवड प्रश्न परीक्षा पद्धतीने घेण्यात यावी.जेणेकरून विद्यार्थी निःशंक,निर्भय व मुक्त वातावरणात परीक्षा देतील अशा आशयाचे मत विद्यार्थी प्रतिनिधी केशव इंगळे, अनिल वासम, अविनाश बनसोडे,संदीप क्षीरसागर,थोरात आदींनी व्यक्त केले.

बुधवार 1 जून रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ च्या मुख्य प्रवेशद्वार येथे सोलापूर शहर जिल्हा विद्यार्थी संघर्ष समितीच्या वतीने बहुपर्यायी निवड प्रश्न परीक्षा पद्धती लागू करा ही प्रमुख मागणी घेऊन धरणे आंदोलन केले. यावेळी विद्यार्थी स्वतः हलगी नाद,शंख नाद व जोरदार घोषणाबाजी करून वातावरण तापवून सोडले.

यावेळी तब्बल दोन तास विद्यापीठाचे मुख्य प्रवेशद्वार बंद केल्यामुळे पोलीस प्रशासन व विद्यापीठ प्रशासनाची तारांबळ उडाली. यावेळी कुलगुरू मा.डॉ.मृणालिनी फडणवीस यांनी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाला पाचारण केले व बाजू ऐकून घेतले.

नेमकी परीक्षा कोणत्या पध्दतीने घ्यावी व त्याचे पुढील मार्गदर्शक सूचना, वेळापत्रक याविषयी मा.मंत्री महोदय व परीक्षा मूल्यमापन मंडळ संचालक यांच्या सोबत यांच्याशी चर्चा झाली असून 16 जून रोजी न्यायालयाची सुनावणी आहे.त्यानंतर विद्यार्थ्यांची मागणी व परीक्षा वेळापत्रक बाबत फेरबदल व शुद्धीपत्र कळविले जाईल असे आश्वासन मा.कुलगुरू डॉ.मृणालिनी फडणवीस यांनी दिल्या. तदनंतर धरणे आंदोलन मागे घेण्यात आले.

यावेळी शिष्टमंडळात अनिल वासम,केशव इंगळे,अविनाश इंगळे,संदिप क्षीरसागर, अभिषेक थोरात,शामसुंदर आडम, विद्यार्थी आघाडी एस.एफ.आय.चे मल्लेशम कारमपुरी, भरत जाधव, विजय गुंड, संतोष म्हमाणे, कृष्णा बाबरे, सम्यक गायकवाड, संतोष चव्हाण, चैतन्य केंगार , आनंद गोसकी आदी उपस्थितहोते.

या निवेदनात असे म्हटलेआहेकी, सबब याबाबत महाराष्ट्रातील अन्य विद्यापीठानी MCQ पद्धतीने परीक्षा घेण्याचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे या विषयीची अद्ययावत माहिती व शासन निर्णय आदींचा आढावा घेऊन सोलापूर विद्यापीठा मार्फत MCQ परीक्षा पद्धत लागू करावी. ही प्रमुख मागणी घेऊन विद्यार्थ्यांच्या मार्फत आपल्या कडे यापूर्वी निवेदने देण्यात आलेली आहेत. याचाही योग्य विचार विनिमय करून योग्य तो विद्यार्थी हिताचा सकारात्मक निर्णय घेऊन न्याय द्यावे.

यावेळी विविध महाविद्यालयाचे विविध शाखेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *