Headlines

Mukesh Kumar: बापाला वाटायचं पोरगं काय करणार नाय! एक मॅच…अन् पोराला लागली कोट्यावधींची लॉटरी!

[ad_1]

IPL Auction 2023: गेल्या काही दिवसांपासून मुकेश कुमार (Mukesh Kumar) हे नाव चर्चेत आहे. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली ज्यावेळी भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात मालिका खेळली जाणार होती. त्यावेळी टीम इंडियामध्ये एका नव्या खेळाडूचा समावेश करण्यात आला होता. नाव होतं मुकेश कुमार… भारतीय संघात स्थान मिळवणारा मुकेश कुमार कोण?, असा सवाल उपस्थित केला जात होता. याच मुकेश कुमारला सध्या सुरू असलेल्या आयपीएल लिलावात (IPL Auction 2023) कोट्यावधींची बोली लागली आहे. (IPL Auction 2023 Mukesh Kumar Bought By Delhi Capitals For 5.50 Crore marathi news)

बांग्लादेश ए आणि भारत ए यांच्यात खेळल्या जाणाऱ्या मुकेश कुमारला संधी देण्यात आली होती. मुकेश कुमारने घातक गोलंदाजी करताना 15.5 षटकात 6 विकेट घेतल्या. त्याने 40 धावा दिल्या आणि 5 मेडन ओव्हर्स टाकले. मुकेशने आपल्या गोलंदाजीने इतका कहर केला की बांग्लादेशी फलंदाज बघतच राहिले. त्यानंतर मुकेश कुमारची एवढी चर्चा झाली की, बीसीसीआयने (BCCI) त्याला दक्षिण आफ्रिका मालिकेत संधी दिली. मात्र, मैदानात उतरण्याची संधी त्याला मिळाली नाही.

अशातच आता सध्या सुरू असलेल्या आयपीएल लिलावमध्ये मुकेशला दिल्लीने (Delhi Capitals) त्याच्या मूळ किंमतीपेक्षा 27 पट जास्त किंमत देऊन खरेदी केलंय. मुकेशची मूळ किंमत 20 लाख रुपये होती. त्याला दिल्ली कॅपिटल्सने 5.50 कोटींमध्ये सामील करून घेतलंय.

बिहारच्या (Bihar Mukesh Kumar) गोपालगंजमध्ये जन्मलेल्या मुकेश कुमार यांचं आयुष्य संघर्षांनी भरलेलं होतं. मुकेशचे वडील ऑटो (Auto Driver) चालवत होते, ज्यांचं गेल्या वर्षी निधन झालं. त्याला सैन्यात भरती व्हायचं होतं. यासाठी तीन वेळा प्रयत्न केलं पण अपयश आले. त्याच्या नशिबात मात्र वेगळंच लिहिलं होतं.

आणखी वाचा – IPL Auction 2023 : ना नाव ऐकलं ना गाव, 13.25 कोटींचा जॅकपॉट लागलेला Harry Brook आहे तरी कोण ?

दरम्यान, आयपीएलमध्ये (IPL) संधी मिळाली असल्याची बातमी मिळताच मुकेश भावूक झाला. त्यावेळी त्याने दिवंगत वडील  काशी नाथ सिंह यांची आठवण काढली. जोपर्यंत मी पश्चिम बंगालसाठी रणजी (Ranji Trophy) खेळलो, तोपर्यंत माझ्या वडिलांना कधीच वाटलं नाही की मी त्यातून व्यावसायिकपणे कोणतंही करिअर (Mukesh Kumar Careers) करू शकेन, असं म्हणत मुकेशने वडिलांची आठवण काढली.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *