मुकेश खन्ना यांचं बेताल वक्तव्य, महिलांना राग अनावर, FIR दाखल होण्याची शक्यता


Mukesh Khanna FIR Notice: लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेते मुकेश खन्ना आपल्या वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असतात. तेव्हा आता पुन्हा एकदा शक्तिमान म्हणून लोकप्रिय असलेले मुकेश खन्ना पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. 

मुकेश खन्ना यांनी आजच आपला एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल केला आहे. त्या व्हिडिओमध्ये महिलांविरोधात त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे ज्यामुळे ते आता अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. आज दिल्ली महिला आयोगाच्या (DCW) अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी मुकेश खन्ना यांच्याविरोधात FIR नोंदवण्यासाठी दिल्ली पोलिसांकडे नोटीस दाखल केली आहे. 

महिलांबद्दल अपमानास्पद आणि चुकीची टिप्पीणी केल्याबद्दल DCW ने मुकेश खन्ना यांच्याविरूद्ध FIR नोंदवण्याची मागणी केली आहे. तसेच FIRच्या कॉपीसह याप्रकरणी काय पावले उचलली आहेत याचा अहवाल 13 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत DCW ला देण्याचीही मागणी या नोटीसातून केली आहे. 

स्वाती मालीवाल यांनीही या नोटीसचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले की, “शक्तिमानची भूमिका साकारणारे अभिनेते मुकेश खन्ना यांनी महिलांविरोधात केलेल्या आक्षेपार्ह विधानांवर FIR दाखल व्हावी यासाठी दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली आहे.” असे ट्विट करताना सध्या मुकेश खन्ना यांच्या विरूद्ध सोशल मीडियावर #SorryShaktimaan हा हॅशटॅग ट्रेंड होतो आहे.

याआधी स्वाती मालीवाल यांनी मुकेश खन्ना यांच्या वक्तव्याला उद्देशूनही त्यांनी टोला लगावला आहे. त्या म्हणाल्या, “केवळ हवेत उडून कोणी शक्तिमान होत नाही, तर महिलांचा आदर करणारा खरा शक्तिमान असतो. अशा प्रकारे मुलींना “धंधावली” म्हणणे हे मुकेश खन्ना यांच्या निच्चतम पातळीची विचारसरणी दर्शवते.  त्यांनी आज आपल्या वक्तव्याबद्दल संपूर्ण देशाची माफी मागितली पाहिजे.” असे ट्विटही स्वाती मालीवाल यांनी केले आहे. 

मुकेश खन्ना यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये ते म्हणाले की, “जी मुलगी एका मुलाला सेक्ससाठी विचारते, ती धंदा करते.” त्यांच्या या वक्तव्यावरून वातावरण भलतेच तापले आहे. Source link

Leave a Reply