Headlines

Morning Tips : अरे सकाळी कोणाचा चेहरा पाहिला होता? ‘या’ गोष्टी पाहिल्यास बिघडू शकतात तुमची कामं

[ad_1]

Morning Tips Trending News : आपण आपल्या आजूबाजूला अनेक लोक पाहिले आहेत, जे काम झालं नाही की त्यांना म्हणतात काय सकाळी उठल्यावर कोणाचा चेहरा पाहिला होता? नवीन सकाळ नवीन उर्जा…सकाळी डोळे उघडल्यावर आपल्या आजूबाजूचं वातावरण आनंदी आणि सकारात्मक असेल तर आपल्या अख्खा दिवस चांगला जातो. कामाच्या ठिकाणी आपण उत्साही असतो. पण जर सकाळी उठल्या उठल्या नकारात्मक गोष्टी घडल्या तर त्याचा परिणाम दिवसभर जाणवतो. 

वास्तूशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रात सकाळी उठल्यावर सगळ्यात पहिले देवाचं नाव घेतलं पाहिजे. खरं तर रात्री झोपताना देवाला धन्यवाद म्हटलं पाहिजे कारण आजचा दिवस चांगला गेला. तर दुसऱ्या दिवशी सकाळी उठून देवाचं स्मरण केलं पाहिजे जेणे करुन आपल्या दिवस चांगला जाईल. वास्तूशास्त्रानुसार सकाळी डोळे उघडताच काही वस्तू बघायचा नसतात. कारण असं केल्यामुळे घरावर आर्थिक संकट आणि तुमचं होणारं काम होतं नाही. चला तर मग जाणून घेऊयात कुठल्या वस्तूंवर नजर गेली नाही पाहिजे ती.  (vastu tips Whose face did you see in the morning because Seeing these things can spoil your work and affect your prosperity wealth and money )

सकाळी डोळे उघडल्यावर ‘या’ गोष्टी पाहू नका

आरसा

सकाळी डोळे उघडताच आरशाकडे पाहणे टाळावे, असं वास्तुतज्ज्ञांचं मत आहे. असं मानलं जातं की, सकाळी व्यक्तीच्या शरीरात नकारात्मक ऊर्जा असते आणि अशा वेळी जर एखाद्या व्यक्तीने आरशात पाहिले, तर ते त्यांचा दिवस खराब करते. म्हणून, सकाळी उठून सर्वप्रथम चेहरा धुवा, मगच आरशात पहा.

गलिच्छ किंवा खराब पदार्थ पाहाणे

वास्तूनुसार रात्री किचनमध्ये घाण भांडी ठेवू नयेत. असं केल्यानं घरात दारिद्र्य येतं. दुसरीकडे, जर तुम्ही सकाळी उठल्याबरोबर घाणेरडी भांडी साफ करण्यास सुरुवात केली, तर शरीरातील सकारात्मक उर्जेचा प्रवाह कमी होतो. त्याचबरोबर लक्ष्मीलाही यामुळे राग येतो. त्यामुळे झोपण्यापूर्वी स्वयंपाकघरातील भांडी आणि स्वयंपाकघर दोन्ही गोष्टी स्वच्छ करून झोपा.

बंद घड्याळ

घरात बंद घड्याळ ठेवणे अशुभ मानलं जातं. त्यामुळे घराच्या भिंतींवर बंद घड्याळ लावू नका. जर तुम्ही सकाळी उठल्यावर हे बंद घड्याळ पाहिले तर याचा अर्थ असा होतो की, तुमची वाईट वेळ सुरू होणार आहे. त्यामुळे सकाळच्या बंद घड्याळाकडे पाहणे टाळावे.

आक्रमक प्राणी किंवा पक्षी

वास्तूनुसार घरामध्ये आक्रमक प्राणी आणि पक्ष्यांचे फोटो लावणे वर्ज्य आहे. पण तरीही, जर कोणी ते लावले, तर त्याने सकाळी ही फोटो  पाहणे टाळावे. सकाळची अशी चित्रे पाहून दिवस कोणत्या ना कोणत्या वादातच जातो.

सावली

तुम्ही सकाळी उठल्यावर स्वतःची किंवा इतर कोणाचीही सावली पाहू नये. जर तुम्ही सूर्य पाहण्यासाठी बाहेर गेलात आणि सूर्य पूर्वेकडून उगवला असताना तुमची सावली पश्चिम दिशेला दिसली. त्यामुळे वास्तूनुसार हे राहुचे चिन्ह असल्याचे सांगितले जाते. अशा स्थितीत पश्चिमेकडे सावली पाहणे अशुभ मानलं जातं.

सकाळी उठल्यावर काय करावे?

वास्तूनुसार सकाळी उठल्याबरोबर आपल्या हाताचे तळवे पाहा. हाताच्या तळव्यात घनश्याम, सरस्वती आणि लक्ष्मी वास करतात. तळहातांना कमळ म्हणतात.

तुमचे तळवे पाहिल्यानंतर देवाचे नाव घ्या आणि नंतर ते चेहऱ्यावर लावा. मग तुमच्या दिवसाची नवीन सुरुवात करण्यासाठी प्रार्थना करा. यानंतर पाणी प्या आणि सूर्याकडे पाहा. जे लोक सूर्योदयापूर्वी उठतात बाहेर चंद्र देखील पाहू शकतात.

(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *