Headlines

मोबाइलमध्ये सतत डोकावणाऱ्या फ्रेंड्सपासून पर्सनल डेटा ‘असा’ ठेवा सेफ, एका क्लिकवर होईल काम, पाहा ट्रिक

[ad_1]

नवी दिल्ली: बरेचदा तुम्ही तुमचा फोन तुमच्या मित्राला काही कामानिमित्त देता. पण, तो मित्र ज्या कामासाठी फोन दिला आहे ते करता उलट तुमच्याच स्मार्टफोनमध्ये डोकावत बसतो. अशात इतरांनी तुमच्या स्मार्टफोनमधील माहिती पाहू नये असे तुम्हाला वाटत असेल तर, आता काळजी करण्याची गरज नाही. काही भन्नाट आणि सोप्प्या टीप वापरल्यास कुणीही तुमच्या फोनमध्ये डोकावू शकणार नाही. तुमचा फोन अनलॉक असला तरीही ही Trick काम करेल. आज आम्ही तुम्हाला Android फोनमध्ये असलेल्या स्क्रीन पिनिंग फीचरबद्दल सांगणार आहोत. ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या डिव्हाइसच्या स्क्रीनवर अॅप लॉक करू शकता. स्क्रीन पिनिंग हे एक साधन आहे ज्याद्वारे तुम्ही डिव्हाइस इंटरफेसवर विशिष्ट App पिन करू शकता. हे फीचर Android 5.0 किंवा त्यावरील सर्व व्हर्जनवर काम करेल. थोडक्यात सांगायचे तर, आता तुम्ही चिंता न करता तुमचा फोन कोणालाही देऊ शकता. ते तुमच्या फोनमध्ये डोकावू शकणार नाही. जाणून घेऊया Screen Pinning फीचर कसे वापरायचे.

वाचा: स्मार्टवॉच खरेदी करण्याआधी ‘ही’ लिस्ट नक्की पाहा, सुरुवातीची किंमत १,९९९ रुपये, फीचर्सही भारी

Screen Pinning फीचर वापरण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स:

अनेक फोनमध्ये हे फीचर पिन विंडोजच्या नावानेही असते. तर, फीचर अनेकांमध्ये हे स्क्रीन पिनिंगच्या नावाने असते. यासाठी तुम्हाला तुमच्या फोनच्या सेटिंगमध्ये जावे लागेल. त्यानंतर तुम्हाला बायोमेट्रिक्स आणि सिक्युरिटी फीचरवर जावे लागेल. यानंतर, तुम्हाला खाली दिलेल्या इतर सुरक्षा सेटिंग्जमध्ये जावे लागेल. येथे तुम्हाला थोडे खाली स्क्रोल करावे लागेल. त्यानंतर पिन विंडोजचा पर्याय खाली दिला जाईल. ते चालू करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला सेटिंग्जमधून बाहेर यावे लागेल. त्यानंतर तुम्हाला पिन करायचे असलेल्या अॅपवर जावे लागेल आणि ते बंद करावे लागेल.

त्यानंतर Recent Apps वर जा आणि तुम्हाला पिन करायच्या असलेल्या App च्या वरच्या आयकॉनवर टॅप करा आणि नंतर Pin the App वर टॅप करा. असे केल्यानंतर ते अॅप पिन केले जाईल आणि त्या अॅपशिवाय दुसरे कोणतेही अॅप उघडणार नाही.

याप्रमाणे अॅप अनपिन करा
: अॅप अनपिन करण्यासाठी, तुम्हाला Back बटण आणि Recent बटणावर एकाच वेळी टॅप करावे लागेल. असे केल्याने ते अॅप अनपिन होईल.

वाचा: भारतातील ‘या’ बेस्ट स्मार्टवॉचेस तुम्हाला आवडणारच, फीचर्स अगदी स्मार्टफोनसारखे, पाहा संपूर्ण लिस्ट

वाचा: अर्ध्यापेक्षा कमी किमतीत तुमचा होईल ३४,९९० रुपयांचा ‘हा’ प्रीमियम स्मार्टफोन, फोन बदलतो रंग, पाहा ऑफर्स

वाचा: गेले टोलचे टेन्शन ! Google Maps च्या ‘या’ फीचरमुळे वाचतील तुमचे पूर्ण पैसे, प्रवास होईल टोल Free, पाहा डिटेल्स

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *