Headlines

मोबाईल,मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीतील एकास अटक

सोलापूर/प्रतिनिधी – सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वडकबाळ तालुका दक्षिण सोलापूर येथे सापळा रचून मोबाईल स्नॅचिंग करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीतील एकास अटक केली.या व्यक्तीकडून विविध 22 कंपनीचे महागडे मोबाईल व बुलेट मोटरसायकल असा 3 लाख 82 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

अधिक माहिती अशी की,सोलापूर जिल्ह्यात मोबाईल सोन्याची मोबाईल चोरी करणारी टोळी सक्रिय झाल्याने सोलापूर जिल्ह्यात मोबाईल स्नॅचिंगच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली होती. याप्रकरणी वरिष्ठांनी माहिती घेऊन सदर मोबाईल स्नॅचिंग व मोबाईल चोरी करणारी टोळीस अटक करून गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते.

स्थानिक गुन्हे शाखेकडे पोलीस शैलेश खेडकर व पथकातील अंमलदार यांना खबरीमार्फत या गुन्ह्यातील आरोपी व्यक्ती टाकळी येथील असल्याची माहिती मिळाली. यासोबत ही व्यक्ती चोरी गेलेले मोबाईल बुलेट मोटरसायकल घेऊन टाकळी तालुका दक्षिण सोलापूर येथे विक्री करण्यासाठी जाणार असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून एका आरोपीला ताब्यात घेतले.

या कामगिरीसाठी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते,अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली शैलेश खेडकर,पोलीस उपनिरीक्षक,सहायक फौजदार श्रीकांत गायकवाड,पोलीस अंमलदार सलीम बागवान,दिलीप राऊत,हरिदास पांढरे,रवी माने,सचिन गायकवाड यांनी कामगिरी केली केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *