Headlines

MMS किंवा व्हिडिओ लीक झाल्यास तो आक्षेपार्ह वेबसाइटवरून कसा हटवायचा?, सोपी ट्रिक जाणून घ्या

[ad_1]

नवी दिल्लीः चंदीगड विद्यापीठातील काही विद्यार्थिनींचा आक्षेपार्ह व्हिडिओ लीक झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. हॉस्टेलमधील एका मुलीने दुसऱ्या विद्यार्थिनींचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवला व त्यानंतर त्या व्हिडिओला व्हायरल केल्याचा आरोप करण्यात येत आहे. परंतु, पोलिसांच्या म्हणण्यानुसार, त्या मुलीने फक्त स्वतःचा व्हिडिओ लीक केला आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी तीन सदस्यीय एसआयटी बनवली आहे. त्यामुळे सध्या असा प्रश्न पडला आहे की, जर कोणता व्हिडिओ लीक होत असेल तसेच एखाद्या आक्षेपार्ह वेबसाइटवर अपलोड करण्यात आला असेल तर त्या ठिकाणाहून तो व्हिडिओ कसा हटवायचा, यासाठी काही टिप्स आहेत का?. तर यासाठी काही सोप्या टिप्स आहेत. तुम्ही या टिप्सला फॉलो करून आक्षेपार्ह वेब साइटवरून तसेच सोशल मीडिया वेबसाइटवर अपलोड केलेला व्हिडिओ किंवा फोटो डिलीट करू शकता. यासाठी सर्वात बेस्ट ऑप्शन दिले आहे. स्थानिक पोलीस ठाण्यात जावून याची तक्रार करणे हाही सोपा ऑप्शन आहे.

वेबसाइटच्या ऑनरकडे करा तक्रार
तुम्ही वेबसाइटच्या ऑनरला कॉन्टॅक्ट करून व्हिडिओला डिलीट करण्यास सांगू शकता. खरं म्हणजे जास्तीत जास्त वेबसाइट्स या कॉपीराइट पॉलिसीला फॉलो करतात. यासाठी ते या प्रकारची पोस्ट तात्काळ डिलीट करतात. जर तुम्ही वेबसाइटच्या ऑनरशी संपर्क करू शकत नसाल तर तुमच्यासाठी दुसरे बेस्ट ऑप्शन सुद्धा आहेत. जाणून घ्या.

ऑनरचा कॉन्टॅक्ट काढण्याची ट्रिक
यासाठी तुम्हाला थर्ड पार्टीकडे जावे लागेल. यासाठी तुम्हाला वेबसाइट www.whois.com वरून मदत मिळेल. यात कोणत्याही वेबसाइटच्या डोमेनचे नाव टाकल्यानंतर त्यासंबंधित डिटेल्स मिळते. या ठिकाणाहून तुम्ही साइट ऑनरला कॉन्टॅक्ट करू शकता. तसेच त्याला तो व्हिडिओ हटवण्यास सांगू शकतात. आक्षेपार्ह साइटवरून व्हिडिओ हटवणे खूप सोपे असते. यासाठी व्हिडिओच्या खाली रिपोर्ट करण्याचा ऑप्शन दिलेला असतो. त्याद्वारे तुम्ही व्हिडिओ हटवण्याचे कारण सांगूून त्या व्हिडिओला हटवू शकतात.

गुगल सर्च रिझल्टमधून हटवण्याची पद्धत
गुगल सर्च रिझल्टमधून कोणत्याही आक्षेपार्ह फोटो किंवा व्हिडिओला हटवणे सोपे आहे. तुम्ही गुगलशी कॉन्टक्ट करू शकता. यासाठी तुम्हाला https://support.google.com/websearch/troubleshooter साइट वर जावे लागेल.

वाचाः TWS चे फॅन असाल तर बजेट किमतीत येणारे ‘हे’ ईयरबड्स तुम्हाला आवडणारच

वाचाः कमी किंमतीत रोज २ जीबी डेटा, वर्षभराच्या वैधतेसाठी बेस्ट आहे प्लान

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *