Headlines

मित्र-मैत्रिणींना स्पेशल WhatsApp स्टिकर्स पाठवून द्या होळीच्या शुभेच्छा, जाणून घ्या स्टिकर्स डाउनलोड करण्याची प्रोसेस

[ad_1]

नवी दिल्ली : देशभरात होळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. होळी अगदी दोन दिवसांवर आली असून, या निमित्ताने लोकांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. गेली दोन वर्ष होळीच्या सणावर असलेले करोना व्हायरस महामारीचे सावट यंदा मात्र कमी झाले आहे. रुग्णसंख्या कमी झाल्याने अनेकजण उत्साहात होळी, धुलिवंदन साजरा करण्याचा प्लॅन बनवत आहेत. तुम्ही Holi 2022 च्या निमित्ताने तुमच्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईकांना फोनवरून शुभेच्छा देऊन डिजिटल होळी देखील साजरी करू शकता. तुम्ही फोनवरून शुभेच्छा देण्यासोबतच इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp वरून देखील शुभेच्छा देऊ शकता. चॅटिंगसाठी प्रामुख्याने WhatsApp चा वापर केला जातो, त्यामुळे तुम्ही खास स्टिकर्स पाठवून WhatsApp लांबच्या नातेवाईकांना शुभेच्छा देऊ शकता.

इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp वरून स्टिकर्स पाठवण्याचे प्रमाण वाढले आहे. वाढदिवसापासून ते कोणताही सण असो, आपण हटके स्टिकर्सच्या माध्यमातून मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईकांना शुभेच्छा देत असतो. होळीच्या निमित्ताने देखील तुम्ही इतरांना रंगेबेरंगी स्टिकर्स पाठवून आनंद साजर करू शकता. एवढेच नाही तर तुम्ही स्वतःचे खास स्टिकर्स देखील तयार करू शकता. शुभेच्छा देताना तुम्ही कार्टून अथवा स्वतःच्या फोटोचा देखील वापर करू शकता. WhatsApp स्टिकर्सच्या माध्यमातून इतरांना होळीच्या शुभेच्छा देऊ शकता, ते जाणून घेऊया.

अशाप्रकारे डाउनलोड करा Holi WhatsApp Stickers

  • सर्वात प्रथम WhatsApp चॅट विंडो ओपन करा.
  • आता विंडोमध्ये स्माइली आयकॉनवर जा व क्लिक करा.
  • येथे तुम्हाला GIF आणि स्टिकर्सचा पर्याय दिसेल.
  • त्यातील स्टिकर्सच्या आयकॉनवर क्लिक करा.
  • येथेच तुम्हाला Get More Stickers चा पर्याय दिसेल. त्यावर टॅप करा.
  • क्लिक केल्यानंतर लिंक तुम्हाला गुगल प्ले स्टोरवर रिडायरेक्ट करेल.
  • येथे Happy Holi सर्च करा व तुम्हाला नवीन स्टिकर्स दिसतील.
  • येथून तुम्ही तुमच्या आवडीचे स्टिकर्स पॅक डाउनलोड करू शकता.
  • स्टिकर्स पॅक डाउनलोड केल्यानंतर चॅटमध्ये जा व त्या स्टिकर्सवर टॅप करून मित्रांना शुभेच्छा द्या.

वाचा: Vivo ने होळीचे दिले ग्राहकांना मोठे गिफ्ट, तीन प्रीमियम स्मार्टफोन्सच्या किंमतीत केली ‘एवढी’ कपात, पाहा डिटेल्स

वाचा: वर्षाला एकदाच करा रिचार्ज! ३६५ दिवसांच्या वैधतेसह येतो ‘हा’ स्वस्तात मस्त प्लान, मिळेल तब्बल ७३० जीबी डेटा

वाचा: मस्तच! आतापर्यंतच्या सर्वात कमी किंमतीत मिळतोय iPhone, तब्बल ४१ हजार रुपयांची होईल बचत; पाहा डिटेल्स

वाचा: होळीला क्लिक करा भन्नाट फोटो, ऑफर्ससह घरी आणा १०८ MP कॅमेरा असणारा Redmi Note 11 Pro+ 5G, आज पहिला सेल

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *