Miss World 2021 : नजर रोखून धरणारी ही सौंदर्यवती ‘बार्बीडॉल’ नाही, तर आहे नवी विश्वसुंदरी


Miss World 2021 : सौंदर्य स्पर्धांमध्ये अतिशय मानाच्या समजल्या जाणाऱ्या Miss World 2021 स्पर्धेत पोलंड येथील कॅरोलिना बिलावस्का हिनं बाजी मारली आहे. या स्पर्धेच्या 70 व्या पर्वात तिनं Miss World 2021 चा किताब पटकावला आहे. प्युर्टो रिको येथे ही स्पर्धा पार पडली. 

सॅन जुआन येथील कोरा कोला म्यूझिक हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या एका दिमाखदार सोहळ्यामध्ये तिच्या डोक्यावर हा मुकुट चढवण्यात आला. 

कॅरोलिनामागोमाग दुसऱ्या स्थानावर अमेरिकेची श्री सैनी आणि तिसऱ्या स्थानावर कोट डिलवोईरची ओलिविया येस यांनी बाजी मारली. 

17 मार्चला जमैकाच्या टोनी एन सिंह हिनं कॅरोलिनाला Miss World 2021 चा मुकूट घातला. या स्पर्धेत भारताच्या मनसा वाराणासी हिसुद्धा सहभागी झाली होती. 

सर्वोत्कृष्ट 13 स्पर्धकांमध्ये तिनं स्थान मिळवलं पण, सर्वोत्कृष्ट 6 स्पर्धकांच्या यादीत मात्र तिला जागा मिळवता आली नाही. 

मिस वर्ल्ड ऑर्गनायजेशनच्या माहितीनिुसार कॅरोलिना सध्या मॅनेजमेंटमध्ये मास्टर्स पदवीसाठी अभ्यास करत आहे. पुढे तिला डॉक्टरेट या मानद पदवीसाठी पीएचडीचा अभ्यास करायचा आहे. 

कॅरोलिना मॉडलिंगमध्येही सक्रिय आहे. याशिवाय ती, स्विमिंग आणि स्कूबा डायविंगसोबतच टेनिस आणि बॅडमिंटन खेळण्यालाही प्राधान्य देताना दिसते. 

कॅरोलिना सामाजिक कामांमध्येही पुढाकार घेताना दिसते. तिच्या या उपक्रमाचं नाव जुपा ना पिएट्रीनी असं आहे. या माध्यमातून ती निराधारांना मदत करताना दिसते. 

सध्या सोशल मीडियावर कॅरोलिनाचे फोटो आणि व्हिडीओ कमालीचे व्हायरल होताना दिसत आहेत. अनेकांनी तर तिला पाहून अरेच्छा ही तर बार्बीडॉल अशीच प्रतिक्रियाही दिली आहे. Source link

Leave a Reply