मी लपून-छपून…; महेंद्रसिंग धोनीच्या एक्स गर्लफ्रेंडचा मोठा खुलासा


मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी नेहमी विविध कारणांमुळे चर्चेत असतो. खेळा व्यतिरिक्त त्याच्या पर्सनल लाईफचे किस्सेही फेमस आहेत. धोनीच्या करियरच्या सुरुवातीला अभिनेत्री राय लक्ष्मीसोबत त्याच्या लव अफेरच्या अनेक चर्चा रंगल्या होत्या. दरम्यान याचसंदर्भात लक्ष्मीने तिची बाजू सांगितली आहे. 

MS Dhoni सोबत असलेल्या अफेअरवर वक्तव्य

धोनीने 2004 मध्ये इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्यावेळी त्याच्या सायलिश लुकमुळे तो खूप चर्चेत होता. यावेळी त्याच्या अफेअरच्या विविध चर्चा रंगल्या होत्या. ज्यामध्ये राय लक्ष्मीच्या नावाचीही चर्चा होती. 

मिळालेल्या माहितीनुसार, धोनी आणि राय लक्ष्मी यांची 2008 मध्ये आयपीएलदरम्यान ओळख झाली होती. या नात्याबद्दल धोनीच्या बाजूने काहीही सांगण्यात आलं नाही. मात्र राय लक्ष्मीने धोनीशी संबंधित प्रश्नांवर खुलेपणाने बोलली आहे. 

एका मुलाखतीदरम्यान लक्ष्मी म्हणाली, धोनी आणि त्यासंबंधी इतर काही गोष्टी होत्या त्या कास्टिंग काऊच नव्हत्या. तुम्हाला एखादी व्यक्ती आवडते, नंतर ती व्यक्ती तुम्हाला आवडत नाही. काही गोष्टी तुमच्यामध्ये योग्य पद्धतीने होत नाहीत आणि तुम्ही दोघांच्या सहमतीने वेगळे होता. 

रिलेशनशिपमध्ये नसल्याचं मी कधीही म्हटलं नाही. माझी अशी बरीच नाती होती, असंही राय लक्ष्मी हिने सांगितलं आहे. 

राय लक्ष्मी पुढे म्हणते, मी लपून-छपून कोणालाही डेट केलं नाही. जर मी कोणाला डेट केलं असेल तर तुम्ही मला त्याच्यासोबत पाहिलं असेल. मी त्याच्यासंदर्भात बोलत नाही ही गोष्ट वेगळी आहे. पण मी त्या गोष्टींपासून पळ काढत नाही. जर मला कोणी बॉयफ्रेंडसोबत स्पॉट करून फोटो काढत असेल तर मला काहीच प्रॉब्लेम नाहीये.

दरम्यान महेंद्रसिंग धोनीने 4 जुलै 2010 रोजी साक्षी रावतसोबत लग्नगाठ बांधली. मिळालेल्या माहितीनुसार, लग्नापूर्वी साक्षी आणि धोनी 2 वर्षांपासून एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते.Source link

Leave a Reply