‘मी खोलीत एकटी बसली होती तेव्हा त्याने…’, अंकिताकडून त्या भयानक प्रसंगाचा अखेर खुलासा


मुंबई : झगमगत्या विश्वातील सर्वात कटू सत्य म्हणजे अभिनेत्रींच्या वाट्याला येणारा कास्टिंग काऊचचा अनुभव. बॉलिवूडमध्ये अभिनेत्री त्यांच्या वाट्याला आलेल्या  कास्टिंग काऊचचा अनुभव उघडपणे सांगतात. सुरवीन चावला, कंगना रनौत, राधिका आपटे, चित्रांगदा सिंह यांनी देखील कास्टिंग काऊच प्रकरणी आपला अनुभव सांगितला आहे. ‘पवित्र रिश्ता’ फेम अभिनेत्री अंकिता लोखंडेने (Ankita Lokhande) देखील तिला आलेल्या कास्टिंग काऊचचा अनुभव सांगितला आहे. 
 

वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी अंकिताने कास्टिंग काऊच सारख्या भयानक प्रसंगाचा सामना केला. एका मुलाखतीत अंकिताने सांगितलं की,  ‘मी जेव्हा 19 – 20 वर्षांची होती, तेव्हा मी एका खोलीत एकटी बसली होती…’ (Ankita Lokhande on Casting Couch)

पुढे अंकिता म्हणाली, ‘मी निर्मात्याच्या एका सहकाऱ्याला विचारलं त्यांना माझ्याकडून कोणत्या प्रकारचं कॉम्प्रोमाइज हवं आहे. ‘त्यांना माझ्यासोबत डिनर डेटला जायचं आहे?’ यावर तो माणून हो म्हणाला…’

'वीस वर्षांची होती तेव्हा....', अंकिताकडून त्या भयानक प्रसंगाचा अखेर खुलासा

त्या व्यक्तीने होकार दिल्यानंतर अंकिता संतापली आणि निर्मात्याच्या सहकाऱ्याला म्हणाली, ‘तुमच्या निर्मात्याला त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवणारी मुलगी हवी आहे,  कौशल्य असलेली नाही…’ असं म्हणत अंकिता निघून गेली. 

अंकिताबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने ‘पवित्र रिश्ता’ मालिकेच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं. शिवाय अंकिताने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली आहे. (ankita lokhande and sushant singh rajput)

सध्या अंकिता तिच्या वैवाहिक आयुष्याचा आनंद घेत आहे. अंकिताने बॉयफ्रेंड विकी जैनसोबत लग्न केलं आहे. लग्नानंतर त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. Source link

Leave a Reply