Headlines

विवाहित असूनही अभिनेत्रीं दुसऱ्या पुरुषावर भाळल्या….; यादीतलं चौथं नाव धक्कादायक

[ad_1]

मुंबई : बॉलिवूड असो किंवा मग टिव्ही सेलिब्रिटी ते सगळे त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेचा विषय असतो. बऱ्याचवेळा सेलिब्रिटी त्यांच्या Extramarital Affair मुळे चर्चेत येतात. अशा काही अभिनेत्री आहेत 
ज्या पतीसोबत राहत असताना दुसऱ्या व्यक्तीच्या प्रेमात होत्या. चला जाणून घेऊ त्या अभिनेत्रींविषयी ज्यांच्या Extramarital Affair च्या चर्चा होत्या. 

या सगळ्या अभिनेत्रींविषयी सांगायचं झालं तर या अभिनेत्रींवर Extramarital Affair चे आरोप करण्यात आले होते. हेच आरोप त्यांचं लग्न तुटण्याचं कारण ठरलं आहे. या यादीत अभिनेत्री मलायका अरोरापासून (Malaika Arora) निशा रावलपर्यंतच्या (Nisha Rawal) नावांचा समावेश आहे. 

मलायका अरोराबद्दल (Malaika Arora) असेही म्हटले जाते की तिच्या आणि अरबाज खानच्या (Arbaaz Khan)घटस्फोटाचे कारण अर्जुन कपूरसोबतची तिची वाढती जवळीक आहे. मलायका सध्या अर्जुन कपूरसोबत (Arjun Kapoor) रिलेशनशिपमध्ये आहे. 

आणखी वाचा : लेकिच्या वाढदिवसानिमित्त खिलाडी कुमार भावूक; त्याचे Emotional शब्द जिंकतायेत मन

अभिनेता आमिर अलीसोबत (Aamir Ali) घटस्फोट घेतल्यानंतर संजीदा शेखवरही (Sanjeeda Sheikh) Extramarital Affair चे आरोप झाले होते. त्यांच्या घटस्फोटाचं कारण अभिनेता हर्षवर्धन राणे (Harshvardhan Rane)  असल्याचं म्हटलं जातं होतं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘तैश’च्या शूटिंगदरम्यान संजीदा शेख आणि हर्षवर्धन राणे यांच्यात जवळीक वाढत होती.

निशा रावलबाबत (Nisha Rawal) करण मेहरानं (Karan Mehra) खुलासा केला की, तिचं अफेअर इतर कोणाशी नसून तिचा मानलेला भाऊ रोहित सेठियासोबत (Rohit Sethia)होतं. करणनं खुलासा केला की, निशा आणि रोहित सेठिया सध्या तिच्या मुलासोबत रितेशच्याच घरी राहत आहेत.

आणखी वाचा : चित्रपट जगताला हादरा; प्रसिद्ध सेलिब्रिटीनं वयाच्या 51 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

रौनक मेहतासोबत (Raunak Mehta) घटस्फोट झाल्यानंतर दीपिका कक्करवरही (Dipika Kakar) Extramarital Affair चा आरोप करण्यात आला होता. खरंतर, 2011 मध्ये, दीपिरा शोएब इब्राहिमला (Shoaib Ibrahim) भेटली आणि 2012 मध्ये तिचा पती रौनकसोबत घटस्फोट झाला. सध्या दीपिका शोएब इब्राहिमसोबत आनंदाचं वैवाहिक जीवनाचा आनंद घेत आहे. 

आणखी वाचा : अरे देवा! पत्नीनेच नवऱ्याचं Ex Girlfriend सोबत लावलं लग्न, आता कसा सुरु आहे त्रिकोणी संसार? पाहा

काम्या पंजाबीवर (Kamya Punjabi) तिचा पूर्वाश्रमीचा पती बंटी नेगीनं विवाहबाह्य संबंधांचा आरोप केला होता. बंटी नेगीनं काम्यावर संजय दत्तचा चुलत भाऊ आणि अभिनेता निमाई बालीसोबत अफेअर असल्याचा आरोप केला होता. मात्र, काम्यानं हे आरोप खोटे ठरवत घटस्फोटानंतर ती आणि निमाई बाली रिलेशनशिपमध्ये आल्याचे सांगितले होते.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *