Headlines

मराठवाडय़ातील इथेनॉल उत्पादनाची भरारी ; १२ वर्षांतील आलेख चढताच

[ad_1]

सुहास सरदेशमुख, लोकसत्ता

औरंगाबाद : दुष्काळी अशी ओळख असणाऱ्या मराठवाडय़ातील ऊसवेडय़ा शेतकऱ्यांनी आणि साखर कारखान्यांनी मिळून गेल्या १२ वर्षांच्या काळात इथेनॉल उत्पादनात मोठी ‘भरारी’ घेतली आहे. २०१० मध्ये केवळ ५७९. ८६ लिटर असणारे इथेनॉलचे उत्पादन आता एक लाख ६७ हजार १०५ लाख लिटपर्यंत पोहचले आहे. साखरेचे बदलत जाणारे दर लक्षात घेता इथेनॉल उत्पादनाशिवाय पर्याय नसल्याचे साखर कारखानदार सांगतात. इथेनॉल उत्पादनात वाढ असली तरी ती केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अजूनही कमीच आहे. गेल्या तीन वर्षांत मराठवाडय़ातून ६८.७३ टक्केच इथेनॉल पुरवठा झाला आहे.

गेल्या १२ वर्षांत सात वेळा अवर्षण स्थितीमध्ये अडकलेल्या शेतकऱ्यांनी ऊस लागवडीची जिगर काही सोडली नाही. गेल्या दोन वर्षांत चांगला पाऊस झाल्याने दणक्यात ऊस लागवड झाली. त्याचे प्रमाण क्षमतेपेक्षाही अधिक होते. त्यामुळे उसाचे गाळप करून घेण्यासाठी सरकारचीही दमछाक झाली. पुढील हंगामातही अशीच स्थिती असण्याची शक्यता आहे. दरम्यान साखर उत्पादन दरामुळे दुय्यम स्थानी ठेवत मराठवाडय़ातील आठ सहकारी साखर कारखाने सात खासगी साखर कारखाने तसेच स्वतंत्र आसवानी प्रकल्पातून इथेनॉल उत्पादनाचा जोर वाढला आहे. गेल्या तीन वर्षांत हे प्रमाण कमालीचे वाढले आहे.

गेल्या तीन वर्षांत पाऊसमान चांगले असल्याने ऊस लागवड वाढली. मात्र, अनेक कारखान्यांकडे इथेनॉल उत्पादनाची सोय नव्हती. या उत्पादनासाठी बँकांकडून मिळणाऱ्या कर्ज पुरवठय़ात विविध अडचणी येत होत्या. त्यात थोडी सुधारणा झाली असली तरी अद्यापि केंद्र सरकारने ठरवून दिलेला इथेनॉल पुरवठय़ाचे उद्दिष्ट गाठता आलेले नाही. गेल्या तीन वर्षांत चार लाख ८५ हजार ७२३ लिटर इथेनॉल उत्पादन करण्याची सूचना करण्यात आली होती. गेल्या तीन वर्षांत तीन लाख ३३ हजार ८३० लिटर उत्पादन घेण्यात आले. इंधनात इथेनॉलचा उपयोग व्हावा म्हणून आखलेल्या नव्या धोरणानुसार अजूनही मराठवाडा मागेच असल्याची आकडेवारी आहे. मात्र, गेल्या वर्षांत िहगोली जिल्ह्यातील पूर्णा, नांदेड जिल्ह्यातील भाऊराव चव्हाण आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्यांनी इथेनॉल उत्पादनात आघाडी घेतली आहे. मात्र, ती पुरेशी नसल्याचे सांगण्यात येत आहे.

गेल्या तीन वर्षांत इथेनॉल उत्पादन वाढले आहे. दोन वर्षांपूर्वी साखर कारखान्यांचे ताळेबंदपत्र फारसे चांगले दिसत नव्हते. त्यात आता सुधारणा झाल्याने कर्ज मिळण्याची स्थितीही निर्माण झाली आहे. काही इथेनॉल प्रकल्प हाती घेतले गेले आहेत. त्यामुळे या वर्षीपेक्षा पुढील वर्षांत इथेनॉल उत्पादन अधिक वाढेल अशी स्थिती आहे. उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आणखी इथेनॉल प्रकल्प उभारावे लागतील. ती प्रक्रिया आता वेगाने सुरू आहे. मराठवाडय़ातील इथेनॉलचे उत्पादन आता वाढू लागले आहे.

जयप्रकाश दांडेगावकर, अध्यक्ष राष्ट्रीय साखर महासंघ

गेल्या तीन वर्षांतील उत्पादन

वर्ष                  निर्धारित उद्दिष्ट         पुरवठा

२०१९-२०             २७५५६.१५            २३९९५

२०२०-२१             १८७४९.७१            १८७४७०.७१

२०२१-२२             २७०६७६              १६७१०५           

एकूण                ४८५७२३              ३३३८३० सर्व

आकडे किलोलिटरमध्ये ६८.७३ टक्के इथेनॉल पुरवठा करण्यात आला आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *