मराठमोळ्या अभिनेत्रीच्या प्रेमात बुडलेला वादग्रस्त अभिनेता का अडकलाय Salman च्या तावडीत?


Shiv Thackre in Bigg Boss: लोकप्रिय टिव्ही शो बिग बॉस 16 प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या शोमधून नानाविध लोकप्रिय कलाकार समील झाले आहेत. या शोमधून कोणी राजकारणी, टेलिव्हिजन कलाकार तर कॉर्ट्रोव्हर्शियस डिरेक्टर असे लोकप्रिय कलाकार समोर आले आहेत. (bigg boss marathi winner shiv thackre enters big boss marathi salman khan hosts the show)

आता या शोमधून मराठमोळा कलाकारही सहभागी झाला आहे. ज्याचं नाव आहे शिव ठाकरे. बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सिझनचा विजेता. मराठी टिव्ही अभिनेत्री वीणा जगताप हिच्या प्रेमात पडलेला शिव ठाकरे आता हिंदी बिग बॉसमध्ये आला आहे. 

आता शिव ठाकरे सलमान खानच्या तावडीत अडकलेला असून सलमान खान इतर स्पर्धकांप्रमाणे त्याचीही शाळा घेणार आहे. शिव ठाकरे दुसऱ्यांदा बिग बॉसमध्ये सामील झाला आहे आणि तेही आता हिंदी बिग बॉसमध्ये तेव्हा जाणून घेऊया शिव ठाकरेबद्दल. 

बिग बॉस मराठीमध्ये असताना शिव ठाकरे वीणा जगतापच्या प्रेमात पडला होता. या शोमधून तिच्यातील जवळीक वाढली होती. त्यानंतर त्यांचे ब्रेकअप झाले. 

शिव ठाकरे हा अमरावतीचा आहे. 9 सप्टेंबर 1989 मध्ये त्याच्या जन्म झाला. त्यानं अमरावतीतच आपलं शिक्षण पुर्ण केलं आहे. संत कवरम विद्यालयातून शिक्षण घेतल्यानंतर शिवनं जी.एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, नागपुर येथून पदवी घेतली आहे. एमटीव्ही रोडीज रायझिंगमधून तो छोट्या पडद्यावर आला आणि आता रिएलिटी शोजचा मोठा चेहरा बनला आहे. 

 

 Source link

Leave a Reply