मराठमोळ्या मुलीवर जडलेला बिग बींचा जीव; मग लग्न का होऊ शकलं नाही?


मुंबई : बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहेत. अमिताभ सध्या ‘कौन बनेगा करोडपती 14’ KBC चे सुत्रसंचालन करत आहेत. येथे येणाऱ्या प्रत्येक स्पर्धकासोबत अमिताभ खूप गप्पा मारतात. बऱ्याचवेळा अमिताभ त्यांच्या आयुष्यातील काही खासगी गोष्टींचा खुलासा करतात. नुकताच अमिताभ यांनी खुलासा केला आहे की कॉलेजमध्ये असताना त्यांनी मुली कोणत्या नावानं हाक मारायच्या. इतकचं काय तर अमिताभ यांच पहिलं प्रेम हे जया बच्चन किंवा रेखा नव्हत्या तर एक मराठी मुलगी होती, हे देखील काही दिवसांपूर्वी समोर आलं आहे. (Amitabh Bachchan’s First Love Was Not Rekha Or Jaya but She Was A Marathi Girl) 

हेही वाचा : Batman फेम लोकप्रिय कलाकाराचं निधन!

खरं तर, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये मध्य प्रदेशचा भूपेंद्र चौधरी यांनी हजेरी लावली होती. यावेळी भूपेंद्र यांनी अनेक गोष्टींवर अमिताभ यांच्याशी चर्चा केल्या. यावेळी भूपेंद्र यांनी अमिताभ यांना एक खास प्रश्न विचारला होता. ‘माझ्या कॉलेजमध्ये 5-6 मुली होत्या ज्या मला शाहरुख खान म्हणून हाक मारायच्या.’ 

अमिताभ यांना कोणत्या नावानं हाक मारायच्या कॉलेजच्या मैत्रिणी?

हे ऐकताच अमिताभ म्हणाले की भूपेंद्र हे हसतात तेव्हा शाहरुखसारखे दिसतात. त्यानंतर भूपेंद्र बिग बींना विचारतात, ‘तुम्हाला तुमच्या वर्गातल्या मुली कोणत्या हिरोच्या नावानं हाक मारायच्या? यावर अमिताभ म्हणाले, ‘त्या मला उंट बोलायच्या.’ KBC 14 चा हा प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

अमिताभ यांना जया किंवा रेखा नाही तर या मराठी मुलीसोबत करायचे होते लग्न!

रेखा आणि जया यांच्या आधी अमिताभ बच्चन यांना एक मराठी मुलगी आवडत होती. रिपोर्ट्सनुसार, अमिताभ यांचे मित्र दिनेश कुमार यांनी अमिताभ आणि या मराठी मुलीच्या नात्याविषयी खुलासा केला होता. थिएटरमध्ये त्या दोघांची मुलाखत झाली होती. ते तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिले.

अमिताभ जेव्हा ते कोलकात्यात होते तेव्हाची ही गोष्ट आहे. अमिताभ ज्या कंपनीत काम करायचे त्या कंपनीत काम करणाऱ्या एका मराठी मुलीसोबत ते रिलेशनशिपमध्ये होते. या मुलीचं नाव चंदा असं होते. इतकंच काय तर अमिताभ यांना चंदाशी लग्न करायचे होते. पण अमिताभ नोकरीसोडून मुंबईत आले. तर त्या मुलीनं बंगाली चित्रपटातील एका प्रसिद्ध अभिनेत्याशी लग्न केलं. Source link

Leave a Reply