Headlines

maratha community demanded reservation in Maratha arakshan parishad held in Solapur

[ad_1]

मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा मोर्चा, संभाजी ब्रिगेडसह मराठा सेवा संघाच्यावतीने सोलापुरात जिल्हास्तरीय मराठा आरक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. मराठा आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कोणत्याही निवडणुका होऊ देणार नाही, असा इशारा या परिषदेत देण्यात आला. घटनात्मक तरतूद असलेल्या ५० टक्के आरक्षणातूनच मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

फेरविचार याचिकेवरील निर्णयानंतरच मराठा समाजाचे मागासलेपण तपासणार

आरक्षण मिळेपर्यंत नोकरभरती होऊ देणार नाही, असा इशाराही या परिषदेत देण्यात आला. एखाद्या समाजाचे आरक्षण स्थगित झाल्यावर सत्ताधारी आणि विरोधक निवडणुका पुढे ढकलतात. या नेत्यांचे मराठा समाजाने काय बिघडवले आहे, असा सवाल मराठा कार्यकर्त्यांनी या परिषदेत केला. मराठा आरक्षणासाठी येत्या काळात आक्रमक मराठा समाज रस्त्यावर उतरेल, असे या परिषदेत मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक रवी मोहिते म्हणाले आहेत. सोलापुरातील शासकीय रुग्णालयात बुधवारी ही परिषद पार पडली.

“…तर कदापी खपवून घेतलं जाणार नाही”, अजित पवारांचा शिंदे-फडणवीसांना इशारा; म्हणाले, “राज्याला गाजर…”

दरम्यान, येत्या १८ सप्टेंबरला सोलापुरात राज्यस्तरीय मराठा आरक्षण परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे. या परिषदेत मराठा आरक्षण आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारवर दबाव वाढत आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा नेत्यांशी आरक्षणासंदर्भात चर्चा केली होती.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *