मंगेशकर कुटुंबीयांवर काँग्रेसनं अन्याय केला, पंतप्रधान मोदींचा घणाघात


नवी दिल्ली :  संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेस पक्षावर घणाघाती आरोप केले. राज्यसभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी अनेक उदाहरणं दिली. (Narendra Modi speech in Rajyasabha)

काँग्रेसच्या (Congress) आजवरच्या सत्ता काळात त्यांनी कोणत्या पक्षांना, कोणत्या व्यक्तींना कसा कसा त्रास दिला याचा पाढाच मोदींनी वाचला. मंगेशकर कुटुंबीयांवर काँग्रेसनं अन्याय केला, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यसभेत केला.  सावरकरांची कविता संगीतबद्ध करुन सादर केली म्हणून पंडित हृदयनाथ मंगेशकर (Pt. Hridaynath Mangeshkar) यांना ऑल इंडिया रेडिओमधून काँग्रेस सरकारनं काढून टाकलं, असा आरोप पंतप्रधान मोदी यांनी केला.

लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचं कुटुंब गोव्यातलं  (Goa) आहे. तिथे त्यांच्या कुटुंबासोबत अन्याय करण्यात आला. लता मंगेशकर यांचे धाकटे बंधू आणि गोव्याचे सुपूत्र असलेल्या हृदयनाथ मंगेशकरांच्या देशभक्तीवर काँग्रेसने संशय घेतला होता, अशी थेट टीका पंतप्रधान मोदी यांनी केली.

हृदयनाथ मंगेशकर यांनी सावरकरांची कविता संगीतबद्ध करुन सादर केली. त्यानंतर दहा दिवसांच्या आतच हृदयनाथ मंगेशकर यांना नोकरीवरुन काढून टाकणअयात आलं होतं, असा दावा पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात केला.

गोवा विधानसभा निवडणुकीच्या (Goa Assembly Election 2022) पार्श्वभूमीवर मोदी यांनी केलेलं हे वक्तव्य अत्यंत महत्त्वाचं मानलं जात आहे. गोवा विधानसभेच्या ४० जागांसाठी येत्या १४ फेब्रुवारीला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. 

‘देशात काँग्रेस नसती तर’
पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात काँग्रेसवर सडकून टीका केली. महात्मा गांधी यांच्या विचारांनुसार कॉंग्रेस नसती तर काश्मीरी पंडितांवर अत्याचार झाले नसते. देशात लोकशाहीची हत्या झाली नसती.

कॉंग्रेस नसती तर देशात जातीवादाची मुळे इतकी घट्ट झाली नसती. कॉंग्रेस नसती तर शिखांचा नरसंहार झाला नसता. कॉंग्रेस नसती तर पंजाबमध्ये दहशतवाद जन्माला आला नसता. असा घणाघात मोदी यांनी केला.

काँग्रेस सत्तेत असताना देशाचा विकास होऊ दिला नाही. आता विरोधात असताना देशाच्या विकासात अडथळे आणत आहेत. असे पंतप्रधान मोदी म्हणाले.Source link

Leave a Reply