Headlines

man strangled wife over desire of son and thrown into the mountains zws 70

[ad_1]

सांगली : मुलाच्या हव्यासातून पत्नीचा गळा आवळून खूनाचा प्रयत्न केल्यानंतर बेशुध्द झालेल्या पत्नीला आटपाडीजवळ डोगरात  फेकून देण्याचा धक्कादायक प्रकार आटपाडी तालुक्यात उघडकीस आला. जखमी महिलेला गावकर्‍यांच्या मदतीने रूग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलीसांनी तातडीने हालचाली करून पतीसह दोघांना गुरूवारी मुंबईमध्ये अटक केली.

हेही वाचा >>> आईच्या वर्षश्राद्धातील ५०० रुपयांची उधारी देण्यावरून वाद, सोलापुरात मोठ्या भावाकडून लहान भावाची हत्या

प्रद्युमनकुमार जेना (रा. मानखुर्द, मुंबई) हा पत्नी प्रेमलता (वय ३०) हिला सोबत घेउन मित्र संपतराव गायकवाड  (मूळ गाव-पात्रेवाडी ता.आटपाडी) पोटात मुलगा आहे की मुलगी हे तपासण्यासाठी मोटारीने सातार्‍याला आले होते. या दांपत्याला दोन्ही मुलीच असल्याने पतीला मुलगा हवा होता. यातून मंगळवारी रात्री मोटारीने येउन आटपाडी तालुक्यातील काळेवाडी गावच्या हद्दीमध्ये  चिंचघाट डोंगरामध्ये महिलेचा दोरीने गळा आवळून ठार मारण्याचा प्रयत्न केला.यामध्ये महिला बेशुध्द झाल्यानंतर ती मृत झाल्याचे समजून तिला डोंगरात टाकण्यात आले व दोघांनीही पलायन केले.

दरम्यान, शुध्दीवर आल्यानंतर महिलेने गावात जाउन नागरिकांना हा प्रकार सांगितला. तात्काळ नागरिकांनी पोलीसांशी संपर्क साधून महिलेला पोलीसांच्या हवाली केले. पोलीसांनी तिला सांगलीतील जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तिच्या जबाबानंतर काल रात्री पती व त्याच्या मित्राविरूध्द खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला.

पोलीसांनी तातडीने हालचाली करून संशयित दोघांचा भ्रमणध्वनीवरून शोध घेत गुरूवारी मुंबईतील ट्रॉम्बे पोलीस ठाण्याच्या मदतीने ताब्यात घेतले.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *