Headlines

मल्लिका शेरावतचं बॉलीवूडबाबत धक्कादायक वक्तव्य म्हणाली, ‘चित्रपटात काम देण्यापूर्वी रात्री…’

[ad_1]

मुंबई : बॉलिवूडमध्ये सुपरबोल्ड अंदाजाने  अभिनेत्री मल्लिका शेरावतने (Mallika sherawat) स्वत:चे अस्तित्व निर्माण केले. मल्लिका शेरावत हिला कोण ओळखत नाही. तिनं फक्त भारतातच नाही तर जगाला ही स्वत:ची दखल घेण्यास भाग पाडले. आपल्या सौंदर्याने आणि बोल्डनेसने लाखो तरुणांच्या हृदयाची धडकन बनलेली मल्लिका शेरावत. तिने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात ‘मर्डर’ चित्रपटातून केली, ज्यामध्ये त्याने इमरान हाश्मीसोबत अनेक हॉट सीन्स दिले. या चित्रपटानंतरच मल्लिकाला ‘सेक्स सिम्बॉल’चा टॅग मिळाला आणि ती एक बोल्ड अभिनेत्री म्हणून दिसली. त्या काळात मल्लिकाच्या अभिनयापेक्षा तिच्या बोल्ड फोटोंमुळेच चर्चेत आली होती.  

मात्र तुम्हाला माहितीये का मल्लिका तिच्या सुरुवातीच्या काळात कास्टिंग काऊचची शिकार झाली होती. आणि याचाच तिच्या चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीवर परिणाम झाला आहे. हे मान्य करण्यास अभिनेत्री कचरत नाही. याबद्दल बोलतातना ती म्हणाली, ‘सर्व ए-लिस्टर नायकांनी माझ्यासोबत काम करण्यास नकार दिला कारण मी तडजोड करत नाही.’ मल्लिकाने तिच्या नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत बरेच खुलासे केले आहेत.

हिरोच्या घरी रात्री 3 वाजता पोहोचावे लागतं
मल्लिकाने दिलेल्या नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, ‘हे त्यांच्यासाठई खूप सोपं आहे. ज्यांना ते नियंत्रित करू शकतात  त्यांच्याशी ते तडजोड करतात आणि अशाच नायिकांना अभिनेते प्राधान्य देतात. मी तशी नाही, माझं व्यक्तिमत्व तसं नाही. मला स्वतःला कोणाच्या तालावर नाचायला आवडत नाही.   

45 वर्षीय अभिनेत्रीने नुकतीच RK या चित्रपटात दिसली होती. चित्रपटात काम देण्यापूर केला जाणाऱ्या कराराचा अर्थ काय ते स्पष्ट करण्यासाठी ती म्हणाली, ‘जर हिरोने तुम्हाला रात्री 3 वाजता फोन केला आणि सांगतिलं ‘माझ्या घरी ये’   तर तुम्हाला जावं लागेल.  जर तुम्ही गेला नाही तर तुम्ही चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवला दातो.

मल्लिका शेरावतला मर्डर या सिनेमातून प्रसिद्धी मिळाली. आहे. पण  गेल्या काही वर्षांत ती रुपेरी पडद्यापासून गायब होती. यामागचं कारण सांगताना ती म्हणाली की, ‘मी माझ्याकडून सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न केला. मी चांगल्या भूमिका शोधण्याचा प्रयत्न केला. मी काही चुका केल्या, जसं आपण सगळेच करतो. काही भूमिका चांगल्या होत्या, काही फारशा चांगल्या नव्हत्या. हा एका अभिनेत्याच्या प्रवासाचा एक भाग आहे, पण एकूणच तो खूप छान झाला आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *