मलायकाच्या प्रेमात आकंठ बुडालेला अर्जुन आईच्या प्रेमासाठी मात्र….


मुंबई : बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरचं नाव नेहमीच मलायकासोबतच्या नात्यामुळे चर्चेत असतं. दोघांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर कमालीचे व्हायरल होताना दिसतात. 

आता अर्जुनचा एक बालपणीचा फोटो समोर आला आहे. जो खूपच चर्चेत आहे. अर्जुन कपूरच्या बहिणीने हा फोटो पोस्ट केला आहे.  चित्रपट निर्माते बोनी कपूर यांची पहिली पत्नी आणि अर्जुन कपूरची आई मोना कपूर यांची पुण्यतिथी असताना अर्जुनची बहीण अंशुला कपूरने एक फोटो शेअर केला आहे.

ती भावूक झाली आणि तिने आईसोबत घालवलेले काही खास क्षण सोशल मीडियावर शेअर केले आहेत.अंशुला कपूरप्रमाणे अर्जुन देखील भावूक झाला असल्याचं बोललं जात आहे. अर्जुन फार क्वचितच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मोकळेपणाने बोलताना दिसतो. 

पण अंशुलाने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करुन भावना व्यक्त केल्या आहेत. अंशुला कपूरने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून आई मोना कपूरसोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

तिने बालपणीचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती आई मोना कपूर, भाऊ अर्जुन कपूरसोबत दिसत आहे. मोना अंशुलासोबत बेडवर बसली आहे आणि अर्जुन खाली बसून नाश्ता करताना दिसत आहे.

 अंशुलाने फोटो शेअर करत लिहिले आहे की, ‘मला हे आठवत आहे. मला या क्षणांची आठवण येत आहे. आम्ही एकत्र केलेल्या रोजच्या गोष्टी मला आता आठवतात….तुमच्या बेडवर बसून रात्रीचं जेवण करणं आणि टीव्ही पाहणं मला आठवतंय.”Source link

Leave a Reply