Headlines

majority of mlas supporting cm eknath shinde looking for ministerial posts zws 70

[ad_1]

मुंबई : शिवसेनेच्या विरोधातील बंडात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ देणाऱ्या बहुसंख्य आमदारांना मंत्रीपदाचे वेध लागले आहेत. मंत्रीपदाच्या आशेनेच काही आमदारांनी शिंदे गटात उडी घेतली होती. शिंदे यांना साथ देणाऱ्या अपक्षांच्या अपेक्षांचे ओझेही त्यांच्यावर आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेनेतील ४० आमदारांनी पाठिंबा दिला. त्यात शिवसेनेच्या सात मंत्र्यांचा समावेश होता. शिंदे गटात प्रवेश करताना या मंत्र्यांनी आपल्याला पुन्हा मंत्रिपद मिळावे ही अपेक्षा व्यक्त केली होती व त्यानुसार शिंदे यांनी त्यांना आश्वासन दिल्याचे समजते. एकनाथ शिंदे यांच्यासह संदीपान भुमरे, दादा भुसे, गुलाबराव पाटील, उदय सामंत, अब्दुल सत्तार आणि शंभूराज देसाई या सात माजी मंत्र्यांनी शिंदे यांना साथ दिली होती.

भाजपबरोबर युतीत शिंदे गटाला किती मंत्रिपदे येतात हे अद्याप तरी जाहीर झालेले नाही. मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात याबाबत चर्चा झाली असावी. कदाचित शिंदे व फडणवीस यांच्या नवी दिल्ली भेटीनंतर मंत्र्यांची संख्या आणि खातेवाटपावर शिक्कामोर्तब केले जाईल. शिंदे गटातील बहुतांशी आमदारांना आपण मंत्री व्हावे असे वाटत असल्याने युतीत जास्तीत जास्त मंत्रिपदे मिळावीत, असा शिंदे यांचा प्रयत्न असेल. पण मुख्यमंत्रीपद शिंदे यांच्याकडे असल्याने जास्तीत जास्त मंत्रिपदे घेण्यावर भाजपचा भर असेल.

उद्धव ठाकरे सरकारमधील नऊ जणांनी शिंदे यांना साथ दिली. त्यातील सात शिवसेनेचे तर बच्चू कडू आणि राजेंद्र येड्रावकर हे अपक्ष आहेत. या नऊ जणांना पुन्हा संधी दिल्यास शिंदे गटातील किती जणांना संधी मिळते हा प्रश्न आहेच. शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आमदारांनाही मंत्रिपदाची अपेक्षा आहे.

शिंदे यांच्या ठाण्यातील एक आमदार मंत्रीपदासाठी प्रयत्नशील आहे. मराठवाडय़ातील दोघांना मंत्रीपद मिळावे, असे वाटते. रायगडमधील शिवसेनेच्या तिन्ही आमदारांनी शिंदे यांना साथ दिली. भरत गोगावले हे आता मुख्य प्रतोद आहेत. यामुळे गोगावले यांना संधी मिळू शकते. कोकणातील उदय सामंत यांनी शिंदे यांना साथ दिली. त्यांनाही मंत्रीपद कायम राहावे ही अपेक्षा आहे. दीपक केसरकर यांनी शिंदे गटाची बाजू सत्तानाटय़ाच्या काळात प्रभावीपणे मांडली. त्यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. उत्तर महाराष्ट्रातून गुलाबराव पाटील यांचे मंत्रीपद नक्की मानले जाते. किती मंत्रीपदे वाटय़ाला येतात यावरच शिंदे गटाचे सारे गणित अवलंबून असेल. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर शिंदे गटातही नाराजीचे सूर उमटू शकतात. यातूनच मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर सरकार कोसळण्याची प्रक्रिया सुरू होईल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली होती. अंतर्गत मतभेदातून हे सरकार टिकणार नाही, असे भाकीत पवार यांनी व्यक्त केले होते.

माजी मंत्री कोण?

संदीपान भुमरे, दादा भुसे, गुलाबराव पाटील, उदय सामंत, अब्दुल सत्तार आणि शंभूराज देसाई या सात माजी मंत्र्यांनी शिंदे यांना बंडखोरीत साथ दिली होती. त्यांची मंत्रिपदाची इच्छाही शिंदे सरकारला पूर्ण करावी लागणार आहे.

अपक्षांना आशा

उद्धव ठाकरे सरकारमधील नऊ जणांनी शिंदेंना साथ दिली. त्यात सात शिवसेनेचे तर बच्चू कडू आणि राजेंद्र येड्रावकर हे अपक्ष आहेत. या नऊ जणांना पुन्हा संधी दिल्यास शिंदे गटातील किती जणांना संधी मिळते हा प्रश्न आहेच. शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आमदानांही मंत्रीपदाची अपेक्षा आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *