माजी भारतीय क्रिकेटर पुन्हा अडकणार विवाह बंधनात… व्हायरल फोटोमुळे एकच चर्चा


मुंबई : क्रिकेटर्स हे कोणत्याही फिल्मी सेलिब्रिटींपेक्षा कमी नाही. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात काय चाललंय आणि ते काय करतात हे जाणून घ्यायला सर्वांनाच आवडते. मग ते आताचे क्रिकेटर असोत किंवा माजी क्रिकेटर. सध्या असेच एक भारताचे माजी फलंदाज चर्चेत आले आहेत. जे आता वयाच्या 66 व्या वर्षी दुसऱ्यांना लग्न बंधनात अडकणार आहेत. अरुण लाल असे या भारतीय माजी फलंदाजाचे नाव आहे आणि ते सध्या बंगाल क्रिकेट संघाचे प्रशिक्षक देखील आहेत. लाल दुसऱ्यांदा नवरदेव बनणार असून यावेळी 28 वर्षीय तरुणीशी त्याचे लग्न होणार आहे.

आश्चर्याचीबाब म्हणजे अरुणची पहिली पत्नी रीमा हिने त्यांना या लग्नाला परवानगी दिली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 66 वर्षीय लाल 2 मे रोजी 38 वर्षीय बुलबुलसोबत लग्न करणार आहेत. लाल अनेक दिवसांपासून बुलबुलला डेट करत होता आणि आता पहिल्या पत्नीला याबाबत सांगून तिची संमती घेऊन ते दोघेही लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे.

लाल आणि रीमा यांचा परस्पर संमतीने घटस्फोट झाला, ज्यानंतर त्यांनी या लग्नाची तयारी सुरु केली.

लालचा त्याची पहिली पत्नी रीमापासून घटस्फोट झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून रीनाची तब्येत बिघडली होती, ज्यामुळे त्या लाल यांच्यासोबत राहत होत्या. लग्नानंतरही अरुण लाल आणि बुलबुल आजारी रीनाची काळजी घेतील.

अरुण लाल निवृत्तीनंतर कमेंटेटर झाले. परंतु, 2016 मध्ये, त्यांना जबड्याचा कर्करोग झाल्याचे निदान झाले, त्यानंतर ते कमेंटेटरपासून दूर झाले आणि येथूनच त्यांच्या कोचिंग करिअरला सुरुवात झाली.

दिल्लीकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणारे अरुण लाल आता बंगाल क्रिकेट संघाचे प्रशिक्षक आहेत. ते प्रशिक्षक झाल्यानंतर बंगालचा संघ १३ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला.

या संघाने चालू हंगामात सलग तीन विजयांसह 18 गुणांसह उपांत्यपूर्व फेरीत स्थान निश्चित केले आहे.Source link

Leave a Reply