माझ्यासाठी सेक्स म्हणजे…; दीपिका पहिल्यांदाच इतकी स्पष्ट बोलली आणि…


मुंबई : अभिनेत्री दीपिका पदुकोण हिनं कायमच तिच्या अभिनयानं चाहत्यांना थक्क केलं. बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर दीपिकानं मोठ्या झपाट्यानं यशाचं शिखर गाठलं. अभिनेता रणबीर कपूर याच्याशी सुरुवातीच्या काळात तिचं प्रेमाचं नातं बहरलं. पण, पाहता पाहता तिला इथं फारसं यश लाभलं नाही. (Deepika Padukone)

रणबीर आणि दीपिकामध्ये दुरावा आला आणि या घटनेनं ती पुरती तुटली. कशीबशी सावरली.

पुढे प्रेमभंगातून सावरलेली दीपिका पुन्हा तिच्या कारकिर्दीवर लक्ष केंद्रीत करु लागली. रणवीर सिंगच्या रुपात तिच्या आयुष्यात पुन्हा प्रेम आलं आणि याच नात्यात ती स्थिरावली.

रणवीरशी विवाहबंधनात अडकल्यानंतरही तिनं चित्रपटांमध्ये नाव कमवणं सुरुच ठेवलं.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘गहराईयां’ या चित्रपटातून तिनं साकारलेल्या अभिनय चाहत्यांची मनं जिंकून गेला. त्यातच दीपिकाच्या एका जुन्या मुलाखतीला पुन्हा उजाळा दिला जात आहे.

जिथं तिनं प्रेम, शारीरिक नातेसंबंध यांवर स्पष्ट मतं मांडली. ‘माझ्यासाठी Sex म्हणजे फक्त शरीरसंबंध नव्हे. कारण यामध्ये भावनाही एकवटलेल्या असतात. कोणाही रिलेशनशिपमध्ये असताना मी केव्हाच कोणाचाही विश्वासघात केला नाही.

मी जर कोणाची फसवणूक करत फिरतेय तर, रिलेशनशिपचा अर्थच काय? मग, एकटं राहणंच उत्तम, नाही का? माझ्या मते सर्वजणच असा विचार करतात असं नाही. म्हणूनच मी भूतकाळात दुखावली गेले असेन’, असं ती म्हणाली होती.

रणबीर आणि दीपिकाच्या नात्याची एका वळणावर बरीच चर्चा झाली. किंबहुना तो फसवत असल्याची तिला अनेकांनी पूर्वकल्पनाही दिली होती.

पण, तरीही नात्याला आणि रणबीरला तिनं एक नवी संधी देण्याचा प्रयत्न केला. तिचा हा प्रयत्नही अयशस्वी ठरला होता. सरतेशेवटी त्यांच्या वाटा वेगळ्या झाल्याच.Source link

Leave a Reply