Headlines

‘माझी तुझी रेशीमगाठ’मधून प्राथना बेहेरे हिने घेतला ब्रेक, हे आहे खरं कारण…

[ad_1]

मुंबई : ‘झी मराठी’वरील लोकप्रिय मालिका ‘माझी तुझी रेशीमगाठ’मधून (Majhi Tujhi Reshimgath) नेहा अर्थात प्राथना बेहेरे (Prarthana Behere ) हिने ब्रेक घेतला आहे. ती मालिका सोडणार का, याचीच चर्चा सुरु झाली आहे. मात्र, तिने ब्रेक घेतल्याचे मोठे कारण पुढे आले आहे. ही मालिका सध्या घराघरात लोकप्रिय झाली आहे. या मालिकेत पुढे काय घडणार याची उत्सुकता शिगेला ताणलेली दिसून येत आहे. मात्र, प्रार्थना बेहेरे हीने ब्रेक घेतल्याचे पुढे आला आहे. त्यामुळे चर्चा सुरु झालेय.

या मालिकेत प्रार्थना बेहेरे ( Prarthana Behere) यामध्ये नेहा हिची भूमिका साकारत आहे. नेहा आणि यश (श्रेयश तळपदे) ही जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे.  परंतु, या मालिकेत नेहाची भूमिका साकारणारी प्रार्थना ही लंडनला जात असल्याचे मालिकेत दाखवले आहे. त्यामुळे पुढील काही दिवस मालिकेत दिसणार नाही. 

हे आहे खरं कारण!

अभिनेत्री प्रार्थना बेहेरे म्हणजेच मालिकेतील नेहा ही तिच्या खऱ्या आयुष्यातील लंडनवारी करत आहे. प्रार्थना तिच्या रिअल लाईफमधील पतीसोबत सध्या लंडनमध्ये आहे. याचे फोटो आणि व्हिडिओ तिने तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावरुन ती सध्या लंडनमध्ये आहे, हे स्पष्ट झाले आहे. ‘माझी तुझी रेशीमगाठी’ या मालिकेतील नेहा पुढचे काही दिवस दिसणार नाही, हे समजताच सध्या प्रेक्षक आणि तिचे चाहते निराश झाले आहेत. 

सध्या प्रार्थना आणि तिचा नवरा अभिषेक हे लंडनवारीचा आनंद लुटत आहेत. मात्र ती लंडन वारीची प्रत्येक झलक प्रेक्षकांसोबत शेअर करत, तिच्या चाहत्यांना अपडेट्स देत आहे. दरम्यान तिने शेअर केलेल्या एक व्हिडिओत ती विमानाने प्रवास करताना दिसते. हा व्हिडीओ तिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिलादेखील टॅग केला आहे.

प्रर्थानाने शेअर केलेल्या तिच्या व्हिडिओत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिला टॅग करत, ‘आम्ही लवकरच येतोय’असे म्हटले आहे. कारण सोनाली कुलकर्णीही देखील सध्या लंडनमध्ये आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *