Headlines

महाबळेश्वरहून प्रतापगडला जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळली

[ad_1]

 वाई: महाबळेश्वरहून प्रतापगडला जाणाऱ्या रस्त्यावर  सोंडेच्या वळणावर मागील काही दिवस सुरू असणाऱ्या संततधार पावसामुळे आज सकाळी दरड कोसळली. यामुळे कुंभरोशी हुन प्रतापगडला जाणारा रस्ता बंद झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी  त्या ठिकाणी पोहोचले असून यंत्रणेच्या माध्यमातून रस्ता लवकरात लवकर खुला करण्यात येईल असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता गोंजारी व तहसीलदार सुषमा पाटील यांनी सांगितले.

 मागील काही दिवस या परिसरात सतत धार पाऊस सुरू आहे त्यामुळे डोंगर उतारावर दरडी कोसळण्याची शक्यता प्रशासनाने या अगोदरच व्यक्त केली आहे. त्याप्रमाणे स्थानिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आज सकाळी महाबळेश्वर प्रतापगड रस्त्यावर दरड कोसळली. यामुळे कुंभरोशीहून प्रतापगडला जाणारा रस्ता बंद झाला, याची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व महसूल विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. साडेदहा अकराच्या दरम्यान यंत्रणेच्या माध्यमातून प्रतापगडकडे जाणारा रस्ता रस्त्यावरील दरड हटवून खुला करण्यात आला. या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. ज्या परिसरात दरड कोसळली त्या ठिकाणी लोक वस्ती नाही. त्यामुळे कोणतेही जीविताचे व शेती नुकसान झाले नाही. अफजल खान कबरीपासून दीड किलोमीटर अंतरावर ही घटना घडली. दरड हटवून रस्ता खुला करण्यात आला असून कुंभरोशी हुन प्रतापगड कडे वाहतूक एका बाजूने सुरु करण्यात आली आहे.दरड हटविण्याचे काम दिवसभर सुरुच राहणार आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *