Headlines

मधुबालाला जीवापाड जपणाऱ्या किशोरदांनी शेवटच्या क्षणी का सोडली साथ, वाचून बसेल धक्का

[ad_1]

मुंबई : अभिनेत्री मधुबाला या बॉलिवूडच्या सर्वात सुंदर अभिनेत्री मानल्या जात होतं होत्या.  दुसरीकडे किशोर कुमारसोबत हे सर्वात यशस्वी गायक म्हणून ओळखले जातात. मधुबाला यांच्या आयुष्यात अनेक पुरुष आले पण त्यांचं रिलेशनशिप हे काही काळचं राहिलं. त्यानंतर मधुबाला या अखेर ‘चलती का नाम गाडी’ आणि ‘हाफ तिकिट’ या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान त्यांना किशोर कुमार भेटले. मधुबाला आणि किशोर कुमार हे ‘हाल कैसा है जनाब का’, ‘एक लडकी भीगी भागी सी’, ‘बाबू समझो ईशारे’ आणि इतर अनेक लोकप्रिय गाण्यांचा भाग होते.

दिलीप कुमारसोबत ब्रेकअप झाल्यानंतर मधुबाला आणि किशोर कुमार रिलेशनशिपमध्ये आले होते. तोपर्यंत किशोर कुमार यांचा पहिली पत्नी रुमा गुहा ठाकुरता यांना घटस्फोट झाला होता. चलती का नाम गाडी आणि हाफ तिकीट सारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केल्यानंतर ते एकमेकांच्या जवळ आले. एक दिवस किशोर कुमार यांनी मधुबाला यांना लग्नासाठी विचारणा केली आणि मधुबाला यांनी लगेच होकार दिला. 1960 मध्ये दोघांनी लग्न केले. 

मधुबालाची बहिण मधुर यांनी फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की मधुबालाच्या तब्येतीचा विचार करता तिनं किशोर कूमारशी लग्न करायला नको असे त्यांच्या वडिलांचे मत होते. तरी देखील मधुबाला यांनी ऐकलं नाही आणि त्यांनी किशोर कुमार यांच्याशी लग्न केलं. मधुबालाच्या तब्येतीविषयी कळताच लग्नाच्या काही दिवसांनी किशोर कुमार मधुबाला यांना लंडनला घेऊन गेले. तिथे मधुबाला यांची तब्येत खालावली, तेव्हा डॉक्टरांनी त्यांना हृदयविकाराचा आजार असल्याचे सांगितले. त्यावेळी डॉक्टरांनी खुलासा केला की मधुबाला यांच्याकडे फक्त दोन वर्षेच उरली आहेत.  

मधुबालाच्या हृदयात शिद्र असून त्यांच्याकडे फक्त २ वर्ष आहेत, हे कळल्यानंतर किशोर कुमार यांनी अभिनेत्रीला त्यांच्या वडिलांच्या घरी सोडले. कारण किशोर कुमार हे त्यांच्या कामात व्यस्त होते आणि त्यामुळे ते मधुबाला यांच्या आरोग्याकडे लक्ष देऊ शकत नव्हते. आपल्या वडिलांकडे राहत असलेल्या मधुबाला एकट्या झाल्या होत्या. त्यांना फक्त पती किशोर कुमार यांच्यासोबत रहायचे होते आणि त्यांच्या आधाराची गरज होती. किशोर कुमार मधुबाला यांच्याशी जास्त वेळ फोनवर बोलत नव्हते. किशोर कुमार हे मधुबाला यांना दोन ते तीन महिन्यातून १-२ वेळा भेटायला यायचे. नेहमी भेटायला का येत नाही असा प्रश्न मधुबाला यांनी किशोर कुमार यांना केला असता ते, म्हणाले मी जर तुला सतत भेटायला आलो तर तू रडू लागशील आणि ते तुझ्या हृदयासाठी चांगलं नाही.

मधुबाला यांची बहिण मधुर याविषयी बोलताना म्हणाली, किशार कुमार हे फक्त यासाठी करत होते की त्यांना जेव्हा मधुबाला नसेल तेव्हा त्यांच्यापासून विभक्त झाल्याचे किंवा ती त्यांच्या आयुष्यात नाही याचे दु: ख होणार नाही. पण त्यांनी कधीच मधुबालाला त्रास दिला नाही. त्यांनी मधुबालाच्या औषधांचा संपूर्ण खर्च केला होता. 

आपली इच्छा असेल तर आपण काहीही करू शकतं असचं मधुबाला यांच्यासोबत झालं. त्या या २ वर्ष नाही तर ९ वर्ष जिंवत राहिल्या. ९ वर्षे त्या बेडरेस्टवर होत्या आणि त्या नेहमी रडे बोलायच्या मला जिवंत रहायचं आहे, मला मरायचं नाही…डॉक्टर कधी यावर उपचार काढतील. मधुबाला यांचे निधन 23 फेब्रुवारी 1969 साली झालं. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *