एम.टी.एस. परीक्षेत उस्मानाबादचे विद्यार्थी राज्यात प्रथम

उस्मानाबाद – एम.टी.एस. अर्थात महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये उस्मानाबादचे विद्यार्थी अव्वल आले असून उस्मानाबाद च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा लागला आहे. यात राज्यस्तरीय गुणवत्ताधारक यादीमध्ये उस्मानाबाद मधील इयत्ता ६ वीची विद्यार्थिनी कु.अनघा प्रशांत जोशी व ६ वीचा विद्यार्थी कु.गिरीश संजय धोंगडे हे प्रथम आले आहेत, तर तृतीय क्रमांकावर इयत्ता चौथीचा विद्यार्थी कु.सोहम बालाजी दंडनाईक यांने बाजी मारली. या विद्यार्थ्यांचा एमटीएस मंडळातर्फे सत्कार करून त्यांना गुणपत्रक व सन्मानचिन्ह देऊन पालकांसमवेत गौरविण्यात आले. सदरील कार्यक्रम हा प्रशासनाने दिलेले सर्व नियम व निर्बंध पाळून करण्यात आला. विद्यार्थ्यांचा यथोचित गौरव करण्यासाठी एमटीएस परीक्षा मंडळाचे संचालक मा.श्री. सुभाष महाजन सर, संचालिका सौ.शरयू महाजन, विवेकानंद युवा मंडळ ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष बाळकृष्ण साळुंके व एमटीएस जिल्हा प्रतिनिधी श्री.द्वारकानाथ एडके यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार समारंभ पार पाडण्यात आला. कार्यक्रमासाठी कृष्णा एडके, शुभम पडवळ, विनय खरके व आदी युवकांनी उत्कृष्ट नियोजन करून कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण केला. यशस्वी विद्यार्थ्यांचे जिल्हाभरात कौतुक होत आहे.

Leave a Reply