लोकांच्या वस्तीत बिबट्याचा धुमाकूळ… व्हिडीओ व्हायरल


मुंबई : आपल्या देशाची इतकी लोकसंख्या वाढली आहे की आता लोकांना राहायला जमीन शिल्लक राहिलेली नाही. ज्यामुळे लोक हळूहळू जंगलाच्या जवळ जाऊ लागले आहेत. लोकांना जागा निर्माण करण्यासाठी अनेक जंगलं कापली देखील गेली आहे. परंतु असं माणसांनी जंगलं संपवण्याचा प्रयत्न केला तर या प्राण्यांनी जायचं कुठे? मग हे प्राणी लोकांच्या वस्तीत येऊ लागतात, ज्यामुळे बऱ्याचदा या प्राण्यांमुळे लोकांचे नुकसान झाले आहे किंवा त्यांना इजा पोहोचली आहे.

अशाच कारणामुळे एक बिबट्या लोकांच्या वस्तीत आला. ज्यामुळे त्या वस्तीत एकच खळबळ उडाली आणि लोक त्या बिबट्यापासून वाचण्यासाठी सैरावैरा पळू लागले.

परंतु हा बिबट्या स्वत:च गांगरला असल्यामुळे, तो आपला स्वत:चा जीव वाचवण्यासाठी इथून तिथून पळू लागला. या बिबट्याने लोकांना काही इजा करु नये म्हणून काही पोलिस कर्मचारी आणि जंगल अधिकारी त्याला पकडण्यासाठी त्याच्या मागून पळत आहेत.

बिबट्याचा हा व्हिडीओ @IGNITETECH2021 ने ट्विटरवर शेअर केला आहे. यामध्ये तुम्हाला बिबट्या रस्त्यावर धावताना दिसत आहे. जरी तो एखाद्या व्यक्तीपेक्षा वेगाने धावत असला तरी, त्याने कोणावरही हल्ला केलेला नाही.

हा व्हिडीओ मेरठचा असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु ही घटना कधीची आहे हे कळू शकलेलं नाही, तसेच या बिबट्याला पुन्हा जंगलात सोडण्यात आले की, नाही हे देखील कळू शकलेलं नाही.Source link

Leave a Reply