‘रानबाजार’मध्ये लेकीचा इंटिमेट सीन पाहून काय म्हणाली प्राजक्ताची आई?


मुंबई : मराठी कलाजगतामध्ये गेल्या काही वर्षांपासून बरेच बोल्ड विषय हाताळत त्याच धर्तीवर कलाकृती साकारण्यात आल्या आहेत. न्यूनगंड म्हणून दुर्लक्षित असणाऱ्या किंवा मग दडवून ठेवलेल्या मुद्द्यांना आता कलाकार मंडळी प्रकाशझोतात आणताना दिसत आहेत. 

‘रानबाजार’ हे त्याचंच एक उदाहरण. ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आता ही एकच सीरिज चर्चेत आली आहे. कारण ठरतंय ते म्हणजे त्यामध्ये असणारं कथानक. टिझर असो किंवा मग ट्रेलर. या सीरिजची प्रत्येक झलक प्रेक्षकांच्या मनात कुतूहलाचे अनेक प्रश्न निर्माण करुन गेली. 

Ranbazar च्या टिझरमध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta mali ranbazar), आतापर्यंत कधीही न दिसलेल्या बोल्ड रुपात दिसली. अवघ्या काही सेकंदांच्या या दृश्यात ती इंटिमेट सीन देताना समोर आली आणि पाहणाऱ्यांनाही काही क्षणांसाठी यावर विश्वास ठेवणं कठीण झालं. 

प्राजक्तानं आतापर्यंत साकारलेल्या भूमिका पाहता, तिचं हे रुप अनेकांसाठीच अनपेक्षित होतं. पण, तिच्या या रुपालाही प्रेक्षकांकडून स्वीकृती मिळताना दिसत आहे. 

देहविक्री करणाऱ्या महिलेची भूमिका साकारणाऱ्या प्राजक्ताला पाहून सर्वजण व्यक्त होत असतानाच तिच्या आईनंही यासाठी तितकीच महत्त्वाची प्रतिक्रिया दिली होती. 

नुकतंच एका मुलाखतीत प्राजक्तानं आईनं दिलेली प्रतिक्रिया जगासमोर आणली. ‘(विचारांच्या बाबतीत) माझी आई माझ्याहूनही बोल्ड आहे. एक कलाकार आणि एक व्यक्ती म्हणून तिला माझ्यातील फरक कळतो. किंबहुना या सीरिजआधी मी तिचीही परवानगी घेतली होती. एक कलाकार म्हणून तिनं मला या भूमिकेसाठी परवानगी दिली’, असं ती म्हणाली.

भूमिका, कथानक, पात्र या साऱ्याची माहिती प्राजक्तानं आईला दिली. त्याचवेळी आईच्या प्रतिप्रश्नानं प्राजक्ताचेही डोळे चमकले. 

‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटाचा संदर्भ देत प्राजक्ताच्या आईनं जर आलिया असं काम करु शकते तर तू का नाही, असाच प्रतिप्रश्न प्राजक्ताला केला आणि या एका क्षणानं आईची प्राजक्ताला असणारी साध सर्वांसमोर आली. Source link

Leave a Reply