Headlines

दडशिंगेत कायदेविषयक शिबीर संपन्न

बार्शी/प्रतिनीधी– लायन्स क्लब बार्शी, विधी सेवा समिती बार्शी आणि ग्रामपंचायत दडशिंगे यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत  येथे विधी सेवा सप्ताहच्या माध्यमातून कायदे विषयक शिबीर आयोजित करण्यात आलं होते.

या शिबिरात गावातील तंटे गावात कसे मिटवावेत कसे मिटवता येतील यावर मा न्यायमूर्ती संधू यांनी सविस्तर मार्गदर्शन केलं तसेच गावातील नागरिकांना कौटुंबिक तसेच प्रॉपर्टी वादावर हि मार्गदर्शन केलं.

 यावेळी मा संधू साहेब वरिष्ठ न्यायालयाचे न्यायमूर्ती,  लायन्स क्लब चे अध्यक्ष ऍड विकास जाधव , ऍड काकासाहेब गुंड अध्यक्ष वकिल संघ बार्शी, ऍड अविनाश जाधव माजी अध्यक्ष वकिल संघ बार्शी, भगवंत पौळ, क्लब चे झोन चेअरमन नंदकुमार कल्याणी, लायन्स क्लब चे दत्तक गाव योजनेचे समन्व्यक गिरीश शेटे,  सरपंच सचिन गोसावी उपसरपंच विलास पाटील , माजी उपसरपंच पांडुरंग घोलप ग्रामपंचायत सदस्य बापूराव घोलप, खंडू हजारे, आलम मुलाणी, दादाराव काळे, दत्तात्रय काळे, आण्णासाहेब काळे, हनुमंत देसाई, सुग्रीव काळे, अनिल घोलप, रामचंद्र घोलप, पोलीस पाटिल बळवंत पाटील, मनोज घोलप, पांडुरंग काळे, सतीश पाटिल, भिमराव काळे, महिला बचत गटाच्या हनीफा पठाण, मंदाकिनी काळे, पुष्पा रांजणकर, सोनाली गोसावी यांच्या सह विविध पदाधिकारी ग्रामस्थ  उपस्थित होते.

तसेच गावातील होणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमाचे हि न्यायमूर्ती संधू साहेबानी कौतुक केलं. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लायन्स क्लब चे अध्यक्ष ऍड विकास जाधव यांनी केलं सुत्रसंचलन पांडुरंग घोलप यांनी केले तर आभार प्रदर्शन सचिन गोसावी यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *