लग्नाला एक महिना होताच आलियानं दाखवलं खरं रुप; एकटक पाहिले जातायत Photo


Alia Bhatt-Ranbir Kapoor one Month Anniversary: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांनी महिन्याभरापूर्वीच लग्नाच्या बंधनात अडकत एका नव्या प्रवासाची सुरुवात केली. 14 एप्रिलला आलिया आणि रणबीरनं लग्न केलं आणि पाहता पाहता त्यांच्या वैवाहिक नात्याला एक महिनाही पूर्ण झाला. 

लग्नाचा महिना पूर्ण होताच आलियानं सोशल मीडियावर एक पोस्ट केली. जिथं तिचं खरं रुप दिसलं… (alia bhatt ranbir kapoor wedding photos )

आता तुम्ही म्हणाल खरं रुप म्हणजे हिनं केलं तरी काय? तर, आलियानं इथे रणबीरसोबतचे काही फोटो पोस्ट केले. हे फोटो त्यांच्याच लग्नसोहळ्यातील आहेत. 

लग्नाचे विधी पूर्ण झाल्यानंतर आलियानं जेव्हा तिचा लूक बदलला त्याच वेळचे हे फोटो. एकिकडे आलिया आणि रणबीर लाल रंगांच्या आऊटफिटमध्ये एकमेकांना शोभून दिसत आहेत. 

 आलियानं शेअर केलेल्या दुसऱ्या एका फोटोमध्ये त्यांच्या वेडिंग पार्टीतील काही क्षण पाहायला मिळत आहेत. जिथं ती सुरेख अशा पार्टी आऊटफिटमध्ये दिसत आहे. तर, रणबीरही सुटमध्ये रुबाबदार दिसत आहे. 

आलिया आणि रणबीर या दोघांनीही त्यांच्या लग्नाच्या वेळी कमीत कमी मेकअप आणि भडक रंगांचा वापर केला होता. त्यांचे हे फोटो पाहिल्यानंतर लगेचच याचा अंदाज येत आहे. 

कोणतंही कॅप्शन न लिहिता आलियानं फक्त काही इमोजींचा वापर करत तिचा आनंद इथं व्यक्त केला आहे. अनेकदा काहीही न बोलता काही क्षणही बरंच बोलून जातात… आलिया आणि रणबीरचे हे फोटो पाहचा याचाच अंदाज येत आहे. 

4 वर्षांचं रिलेशनशिप आणि त्यानंतर लग्नाचं पाऊल उचलणारी ही जोडी सध्या लोकप्रियता आणि प्रसिद्धीच्या बाबतीत भल्याभल्या जोड्यांना मागे टाकत आहे. 

वैयक्तिक आयुष्यात एकमेकांची साथ देणारं हेच कपल येत्या काळात ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटातून स्क्रीन शेअर करत आहे. अयान मुखर्जी या दिग्दर्शित या चित्रपटातून आलिया आणि रणबीर झळकणार आहेत. लग्नानंतर एकत्रितरित्या प्रदर्शित होणारा हा त्यांचा पहिलाच चित्रपट असेल.  Source link

Leave a Reply