लग्नात बूट चोरीला गेले म्हणून ग्लेन मॅक्सवेलची पोलिसांत धाव?


मुंबई : भारतीय पद्धतीचं लग्न म्हटलं की, अनेक परंपरा या आल्याच…काही परंपरा या फार गमतीशीर असतात. अशीच एक परंपरा म्हणजे नवऱ्यामुलाचे बूट लपवणं. दरम्यान याच परंपरेमुळे ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज खेळाडू ग्लेने मॅक्सवेल थेट पोलिसांमध्ये गेला असल्याची माहिती आहे. बूट हरवले, म्हणून ग्लेन मॅक्सवेलने पोलिसांत एफआयआर दाखल केल्याचा एक मीम सध्या तुफान व्हायरल होतोय. 

दरम्यान यामध्ये तथ्य नसून हा केवळ एक गंमतीशीर मीम सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. लोकांनीही यावर भरपूर कमेंट्स केल्या आहेत.

या मीममध्ये ऑस्ट्रेलियाच्या एका वेबसाईटमध्ये याची माहिती देण्यात आलीये. या मीममध्ये लिहिलंय की, ‘ग्लेन मॅक्सवेलने त्याच्याच लग्नात बूट हरवल्यामुळे पोलिसांत तक्रार केली आहे. मात्र त्यांनंतर त्याला ही एक परंपरा असल्याचं सांगण्यात आलंय.

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेलने आपल्या गर्लफ्रेंडसोबत विवाह केला आहे. आधी ख्रिश्चन पद्धतीनं विवाह केला. ग्लेनची गर्लफ्रेंड तामिळची असल्याने तामिळ पद्धतीनं विवाह सोहळा होणं अजून बाकी आहे. 

18 मार्च 2022 रोजी या दोघांनी ख्रिश्चन पद्धतीनं विवाह केला. या लग्नसमारंभासाठी काही खास लोकांचीच उपस्थिती होती. मॅक्सवेलनं आपल्या लग्नाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते.

ग्लेन मॅक्सवेल आणि विनी यांची पहिली भेट मेलबर्न स्टार्स इव्हेंट दरम्यान झाली होती. त्यानंतर दोघांच्याही भेटीगाठी वाढायला लागल्या. एकमेकांना डेट केल्यानंतर 2017 मध्ये दोघंही रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. दरम्यान आता 27 मार्च रोजी दोघांचा विवाह तामिळ पद्धतीने होणार आहे.Source link

Leave a Reply