लग्नाआधीचं Alia Bhatt गरोदर; बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्रींनी यापूर्वीच उचललं ‘हे’ पाऊल


मुंबई :  बॉलिवूडमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांनी 14 एप्रिल रोजी लग्न करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. लग्नाच्या दोन महिन्यांनंतर कपूर कुटुंबातून एक आनंदाची बातमी समोर येत आहे. आलिया लवकरचं आई होणार आहे. खुद्द आलियाने सोनोग्राफी दरम्यानचा फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये ‘लवकरचं आमचं बाळ येणार आहे…’ असं लिहिलं आहे. 

लग्नानतंर दोन महिन्यांमध्ये आनंदाची बातमी दिल्यानंतर आलिया लग्नाआधीचं गरोदर होती का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री अशा आहेत, ज्यांनी लग्नाआधीचं बाळाला जन्म दिला. अशाचं नऊ अभिनेत्रींबद्दल आज जाणून घेऊ. 

कोंकणा सेन : कोंकणा सेनने अभिनेता रणवीर शौरीसौबत 2010 मध्ये लग्न केले. पण काही महिन्यातच तिने मुलाला जन्म दिला. कोंकण ही लग्नापूर्वीच गर्भवती राहिल्याने दोघांनी अतिशय घाईत लग्न केले. 

श्रीदेवी : अनेक अभिनेत्रींना आपल्या प्रेग्नेंसीची माहिती लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला. पण श्रीदेवीने 7 महिन्याची गर्भवती असताना ही गोष्ट लपवली नाही आणि बोनी कपूर यांच्यासोबत लग्न केलं.

सारिका : सारिका आणि कमल हसन यांची जोडी चित्रपटांमधून चांगलीच चर्चेला आली. दोघेही 2 वर्ष लिव्ह इन रिलेशनमध्ये होते. त्यादरम्यानच सारिका यांनी मुलीला जन्म दिला. त्यानंतर 2 वर्षांनी कमल आणि सारिका यांनी लग्न केलं. पण ते ही जास्त काळ टिकू शकलं नाही.  

महिमा चौधरी : 2006 मध्ये महिमाने बॉबी मुखर्जीसोबत लग्न केलं. लग्नापूर्वीच गर्भवती राहिल्याने महिमाने घाईत लग्न केलं. पण या गोष्टीची तिने कधीच स्वीकार केला नाही. 

अमृता अरोरा :  2009 मध्ये अमृता अरोराने उद्योगपती शकील लडकसोबत लग्न केलं. अचानक लग्नाचा निर्णय घेतल्यामुळे ती चांगलीच चर्चेत आली. शकिलबरोबर डेटिंग करत असताना अमृताला गरोदर राहीली. 2010 मध्ये तिने मुलाला जन्म दिला.

सेलिना जेटली : सेलिना जेटलीने कोणालाही काहीही न कळू देता लग्न केलं.  जुलै 2011 मध्ये हॉटेल व्यवसाईक पीटर हॉगबरोबर तिचे लग्न झाले आणि त्यानंतर मार्च 2012 मध्ये तिने जुळ्या बाळांना जन्म दिला. 

नीना गुप्ता : नीना गुप्ताचं क्रिकेटर रिर्चड्स सोबत अफेअरच्या बातम्या चर्चेत आल्या होत्या. नीनाच्या प्रेग्नेंसीच्या बातम्यांनी अनेकांना धक्का बसला होता. 1989 मध्ये नीनाने मुलगी मसाबाला जन्म दिला आणि सिंगल मदर म्हणून तिचे संगोपन केले.

अनुष्का शंकर : प्रसिध्द सितारवादक आणि म्यूझिशिअन अनुष्का शंकर याही लग्नापूर्वी गर्भवती राहिल्या. त्यांनी ब्रिटीश निर्माता जो राइटसोबत 26 सप्टेंबर 2010मध्ये लग्न केलं आणि 5 महिन्यात म्हणजेच 22 फेब्रुवारी 2011ला मुलगा जुबिन शकंरला जन्म दिला.

वीणा मलिक : पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिकने 25 डिसेंबर 2013ला व्यावसायिक असद बशीर खानसोबत लग्न केले. सप्टेंबर 2014मध्ये तिने मुलगा अबरामला जन्म दिला. हा मुलगा असद यांचा नसल्याच्या अनेक चर्चा त्यावेळेस रंगल्या पण वीणाने या चर्चांवर  मौन बाळगणं पसंत केलं.Source link

Leave a Reply