IPL 2022 : के एल राहुलने मोडला विराट कोहलीचा मोठा रेकॉर्ड


मुंबई : भलेही बंगळुरू टीम आयपीएलचा लखनऊ विरुद्धचा सामना जिंकली असेल पण चर्चा तर के एल राहुलची होत आहे. के एल राहुलने विराट कोहलीचा विक्रम मोडला आहे. बंगळुरूने लखनऊचा 18 धावांनी पराभव केला. बंगळुरूचा माजी कर्णधार विराट कोहलीला मात्र धक्का बसला. 

विराट कोहलीच्या नावावर असलेला रेकॉर्ड के एल राहुलने मोडला. सर्वात वेगानं 6000 धावा पूर्ण करण्याचा कोहलीच्या नावावर असलेला विक्रम के एल राहुलने मोडला आहे. त्याचं कौतुक सोशल मीडियावर आणि क्रीडा विश्वात होत आहे. 

बंगळुरू विरुद्ध झालेल्या सामन्यात के एल राहुलने 30 धावा केल्या. यासोबत त्याने विराट कोहलीचा एक मोठा रेकॉर्ड मोडला आहे. सर्वात वेगानं टी 20 मध्ये 6000 धावा पूर्ण करणारा तो भारतीय खेळाडू ठरला. 

के एल राहुलच्या आधी हा विक्रम विराट कोहलीच्या नावावर होता. के एल राहुलने 166 डावांमध्ये हा विक्रम रचला. तर कोहलीनं 184 डावांमध्ये 6000 धावा पूर्ण केल्या होत्या. तिसऱ्या स्थानावर शिखर धवन आहे. 

सर्वात वेगानं 6000 धावा करणारे भारतीय खेळाडू
के एल राहुल
विराट कोहली
शिखर धवन
सुरेश रैना
रोहित शर्मा

के एल राहुल करिअर
केएल राहुलने एकूण 179 टी-20 सामने खेळले ज्यामध्ये त्याने 43.52 च्या सरासरीने 6007 धावा केल्या. त्‍याच्‍या नावावर टी-20 क्रिकेटमध्‍ये 50 अर्धशतकं आणि 5 शतके आहेत. 

केएल राहुल आयपीएलमध्ये देखील फुल फॉर्ममध्ये आहे. त्याने आयपीएलच्या 101 सामन्यांमध्ये 47.17 च्या सरासरीने 3538 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये त्याने 3 शतकं झळकवली. यंदाच्या हंगामात 7 सामन्यात 265 धावा केल्या तर एक शतक ठोकलं.

के एल राहुलने कोहलीचा रेकॉर्ड मोडला पण सामना गमवला. आता लक्ष आयपीएलच्या ट्रॉफीवर आहे. यंदा आयपीएलची ट्रॉफी नव्यान आलेल्या लखनऊ टीमकडे घेऊन येण्याचं लक्ष्य के एल राहुलचं आहे. Source link

Leave a Reply